
India US Postal Suspension : ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 50 टॅरिफच्या निर्णयानंतर India Post ने अमेरिकेकडे जाणारी सर्व टपाल सेवा 25 ऑगस्टपासून तात्पुरती बंद केली केली आहेत.
मुंबई : भारताच्या पोस्ट विभागाने (India Post) अमेरिकेकडे जाणारी सर्व प्रकारची टपाल सेवा (Postal Services) तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर (Indian Goods) 50 टक्के टॅरिफ (Tariffs) लावल्याने आणि नवीन कस्टम्स नियम लागू केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकेचा नवा नियम (New US Duty Rules)
30 जुलै 2025 रोजी अमेरिकेने नवीन कस्टम निर्णय जारी केला. याअंतर्गत 29 ऑगस्टपासून 800 डॉलर्सपर्यंतच्या वस्तूंवरील (Duty Free Goods) शुल्कमुक्त सवलत रद्द करण्यात आली आहे.
म्हणजेच आता अमेरिकेत जाणाऱ्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय पोस्ट वस्तूंवर शुल्क (Custom Duty) आकारले जाईल. मात्र, 100 डॉलर्सपर्यंतच्या गिफ्ट वस्तूंना (Gift Items) शुल्कातून सवलत मिळणार आहे.
भारताचा निर्णय (India Post Suspension Decision)
अमेरिकेच्या या निर्ययानंतर, 25 ऑगस्ट 2025 पासून अमेरिकेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल सेवांचे बुकिंग थांबवले जाईल. 100 डॉलर्सपेक्षा कमी किमतीच्या वस्तू मात्र पाठवता येतील. अमेरिकेकडे जाणारे हवाई वाहतूकदार (Air Carriers) तांत्रिक तयारी नसल्यामुळे या सेवा स्वीकारण्यास असमर्थ आहेत. आधीच बुक केलेल्या पण न पाठवता येणाऱ्या वस्तूंवर ग्राहकांना परतावा (Refund) मिळणार आहे.