टॉप न्यूज़दुनियादेशमहाराष्ट्रराजनीतिराजस्थानराज्यलोकल न्यूज़

विम्यात शेतकऱ्यांची उघड लूट – काहींना ४५ हजार, काहींना फक्त ७ हजार! हा अन्याय थांबवाच, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील!”

विशेष प्रतिनिधी

शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्ह्याचा सरकारला इशारा – तक्रार निवारण समितीने चौकशी करून अहवाल राज्य सरकारकडे तातडीने पाठवा.

2023-24 च्या पिक विम्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रचंड अन्यायकारक दुजाभाव सहन करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तब्बल ₹45,000/- इतकी विमा रक्कम देण्यात आली आहे, तर त्याच जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांना केवळ ₹7,000/- इतकी अल्प रक्कम देण्यात आली आहे. हा प्रकार शेतकऱ्यांची थेट फसवणूक असून शासन व विमा कंपन्यांच्या संगनमताचा पुरावा आहे.

2023 पासून आतापर्यंत शेतकरी योद्धा कृती समितीने राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन माजी कृषी मंत्री मा. माणिकराव कोकाटे यांची दोन वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले, तसेच चार वेळा पाच-पाच हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढूनही सरकारकडे न्याय मागितला. मात्र इतक्या मोठ्या आंदोलनांनंतरही सरकारला अजून जाग आलेली नाही, हे अत्यंत दुःखदायक आणि शेतकऱ्यांचा अपमान करणारे आहे.

बुलढाणा जिल्ह्यात या संदर्भात अनेक ठिकाणी क्रांतिकारी लढे झाले. क्रांतिकारी संघटनेचे श्री. रवीकांत भाऊ तुपकर यांनी पिक विमा संदर्भात उपोषण व आंदोलन केले, शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने बालाजी सोसे व गजानन जायभाये यांनी उपोषण व आंदोलन केले, तर चिखली येथे शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी सुद्धा उपोषण व आंदोलन केले. अशा असंख्य लढ्यांनंतरही प्रशासन बहिरे बनून बसले आहे आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काकडे सतत दुर्लक्ष करत आहे.

शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्ह्याची ठाम मागणी आहे की :

तक्रार निवारण समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करावी.

सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे तात्काळ पाठवावा.

कमी विमा मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना योग्य ती विमा रक्कम देण्यात यावी.

👉 सरकारने जर अजूनही शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये हाच शेतकरी सरकारला जबरदस्त धडा शिकवेल. शेतकऱ्याच्या घामाला न्याय न देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना गादीवर बसायचा हक्क उरणार नाही.

प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करतील, असा इशारा समितीने दिला आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील.

🔥 “शेतकऱ्याचा आवाज दाबलात, तर तो वादळ बनून उठेल!” 🔥
शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा यांचा इशारा
दिनांक : ___

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!