सेवली ग्रामपंचायतीत पत्रकारांना विरोध – पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह!

सेवली ग्रामपंचायतीत पत्रकारांना विरोध – पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह!
जालना प्रतिनिधी सय्यद इलियास सादेक. मो. 8308302662
आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी सेवली (ता. जि. जालना) येथे ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेला सेवलीतील सर्व ग्रामस्थांसह शेतकरी न्यूज चे जिल्हा प्रतिनिधी श्री. सय्यद इलियास सादेक हेही उपस्थित होते. मात्र, ग्रामसभेची बातमी कव्हर करत असताना सेवली येथील सरपंच गणेश मोरे यांनी सरळसरळ पत्रकारांना विरोध केला.
ग्रामसभेसारख्या लोकशाहीच्या व्यासपीठावर माध्यमांना बातमी देण्यास विरोध केला जात असेल, तर सामान्य जनता, कामगार व शेतकऱ्यांना कशी वागणूक दिली जात असेल याचा विचार ग्रामस्थांनी करावा, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
शेतकरी न्यूज ची ठाम मागणी सेवली ग्रामपंचायतीतील या प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी तातडीने चौकशी लावावी आणि ग्रामपंचायतीतील चालू असलेला विकास आराखडा बद्दल चौकशी करावी आणि जनतेसमोर मांडावी




