धनगर वस्तीच्या पुनर्वसनाचा प्रश्न — तहसीलदार दिवटे साहेब व छोटू पवार यांच्या मध्यस्थीने अन्नत्याग आंदोलन थांबले

धनगर वस्तीच्या पुनर्वसनाचा प्रश्न — तहसीलदार दिवटे साहेब व छोटू पवार यांच्या मध्यस्थीने अन्नत्याग आंदोलन थांबले
वर्दडी बुद्रुक प्रतिनिधी :
गारखेड धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वार्ड क्रमांक ३ मधील धनगर वस्तीतील ग्रामस्थांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी ११ सप्टेंबर रोजी अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ वस्ती असल्याने पूरस्थिती, मार्गांचा अभाव आणि सुरक्षिततेचा धोका यामुळे ग्रामस्थ वर्षानुवर्षे त्रस्त आहेत.
ग्रामस्थांचा आक्रोश लक्षात घेऊन तहसीलदार अजित दिवटे, पोलिस निरीक्षक आशिष इंगळे व युवा नेते संदीप (छोटू) पवार यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने पुढे नेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला अन्नत्याग मागे घेतला.
या चर्चेत व ग्रामसभेत प्रदीप बिलोरे, श्रावण डोंगरे (गोपनीय विभाग), मंडळ अधिकारी गिरी, पाटबंधारे उपविभागाचे अभियंता एन.पी. महाजन, सचिव राजेंद्र मेहेत्रे, तलाठी संदीप इंगळे, राहुल लोहकरे, महादेव इंगळे, प्रकाश भालमोडे, विलास भिसे, गणेश राठोड, योगेश इंगळे, आकाश भिसे, राजू लोहकरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.



