छत्तीसगढ़टॉप न्यूज़दुनियापंजाबमध्य प्रदेशमहाराष्ट्रयूपीराजनीतिराजस्थानराज्यलोकल न्यूज़

खैरखेड चा शेतकरी आश्रू मध्ये बुडतोय पण सरकार आणि प्रशासन त्याच्याकडे कानाडोळा करते

खैरखेड चा शेतकरी आश्रू मध्ये बुडतोय पण सरकार आणि प्रशासन त्याच्याकडे कानाडोळा करते

दुष्काळ जाहीर न झाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

. शेतकरी न्यूज चे विशेष, प्रतिनिधी मधुकर मुंडे

आज आमचे शेतकरी न्यूज चे प्रतिनिधी ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो त्यावेळेस अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या पीक नष्ट झालेली होती कुटुंब उपाशी होते डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे

सरकार आणि प्रशासन बधिर बनून बसलेले आहे,

शेतकरी मरतोय प्रशासन आणि सत्ताधारी मोन बाळगून बसलेले आहे,

शेतकऱ्याचा वाली कुणीच नाही का,

शेतकऱ्याला न्याय द्यायचा नाही का,

सिंदखेड राजा तालुक्यातील परिस्थिती दुष्काळजन्य आहे, शेतात उभी पिके डोळ्यादेखत जळत आहेत शेतकरी हवालदिल झालेला आहे तरीही सरकारकडून दुष्काळ जाहीर होत नाही,

सरकारला नेमकं कधी जाग येणार,

शेतकऱ्याचे जीवाशी हा खेळ किती दिवस चालणार प्रशासन फक्त कागदावर दाखले देतंय पण मदत मात्र शून्य जर शेतकऱ्याच्या सुरू प्रशासनाला दिसत नसतील तर उद्या या अश्रूचा बांध फुटायला वेळ लागणार नाही,

आणि मग प्रशासनाला याची किंमत मोजावी लागेल सिंदखेड राजा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर न केल्यास शेतकरी योद्धा कृती समिती खैरखेड तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल याची पूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची असेल म्हणून त्वरित सर्वे करा शेतकऱ्याला मदत द्या अशी या गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!