Uncategorized

खैरखेडमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

खैरखेडमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान दिनांक : २२ सप्टेंबर २०२५

ठिकाण : खैरखेड (सिंदखेडराजा तालुका)

गेल्या रात्री नेमके एक वाजता खैरखेड गाव परिसरात अचानक ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे गावातील शेतकऱ्यांची उभी पिके काही क्षणातच पाण्याखाली गेली. राहिलेली सोयाबीन, कपाशी, हळद व इतर खरीप पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या कष्टाचे स्वप्न क्षणात मातीमोल झाले आहे.

या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून अनेक शेतकरी उपासमारीच्या उंबरठ्यावर आले आहेत. शेतकरी हतबल झाले असून त्यांच्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. प्रशासनाने त्वरित खैरखेड गावाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचे होणारे हाल थांबवावेत, ही शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!