Uncategorized

सेवली (ता. जि. जालना) : ग्रामसभेत अतिक्रमण व रखडलेली रस्त्यांची कामे यावर ग्रामस्थांचा संताप

सेवली (ता. जि. जालना) : ग्रामसभेत अतिक्रमण व रखडलेली रस्त्यांची कामे यावर ग्रामस्थांचा संताप

शेतकरी न्यूज जालना जिल्हा प्रतिनिधी. स. इलियास. स. सादेक

आज सेवली गावात ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत गावातील अतिक्रमणाचा मुद्दा ग्रामस्थांनी ठामपणे मांडला. बाजार पट्ट्यातील दुकाने समोर मोठ्या प्रमाणावर कच्चे व पक्के अतिक्रमण झालेले असून त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ग्राहकांना दुकानात येण्यासाठी व जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात, विशेषतः आठवडी बाजाराच्या दिवशी परिस्थिती अधिकच बिकट होते.

ग्रामस्थ व व्यापारी वर्गाचे स्पष्ट मत होते की, ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देऊन सर्व अतिक्रमण हटवावे, शासकीय जागा ताब्यात घ्यावी आणि बाजार पट्टा मोकळा करावा.

याचबरोबर ग्रामस्थांनी रखडलेली रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करण्याचीही मागणी केली. त्यात विशेषतः –

पेटकर नगर येथील रस्ता

देशी दारू दुकान समोरील रस्ता

वॉर्ड क्रमांक 1 मधील हमीद अन्सारी नगर परिसरातील अपूर्ण रस्ते

हे रस्ते अपूर्ण अवस्थेत असून, नागरिकांना दैनंदिन वाहतुकीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ग्रामसभेत उपस्थित मान्यवरांमध्ये सेवली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राठोड सर, पो.उ.निरीक्षक खटकळ सर, सरपंच विठ्ठल मोरे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश होता. ग्रामस्थांतून राजू मुळे, प्रल्हादराव पालवे, विकास सदावरते, इम्रान अन्सारी आदींनी ग्रामसभेत आपली मते मांडली.

ग्रामस्थांनी एकमुखाने मागणी केली की, ग्रामपंचायतीने व प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करून गावातील अतिक्रमण व रस्त्यांच्या समस्या सोडवाव्यात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!