टॉप न्यूज़दिल्ली NCRदेशमहाराष्ट्र

सत्ता आली नाही तरी चालेल, पण समाजाचा विश्वास ढळू देणार नाही विलास विघ्ने यांचा निर्धार —

: सत्ता आली नाही तरी चालेल, पण समाजाचा विश्वास ढळू देणार नाही विलास विघ्ने यांचा निर्धार —

१९९५ पासून बाळशिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रती निष्ठा ठेवत कार्यरत असलेले खंदे शिवसेनी कार्यकर्ते विलास विघ्ने यांनी आपला संपूर्ण प्रवास जनतेच्या सेवेला अर्पण केला आहे.
राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर देत — ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे तत्त्व त्यांनी आजवर जपले आहे. प्रत्येक गावातील सुख-दुःखात सहभागी राहणं, लोकांच्या अडचणी जाणून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी झटणं हेच त्यांचं खरं ध्येय आहे.

मागील जिल्हा परिषद निवडणुकीत विलास विघ्ने किनगाव राजा मतदारसंघातून उमेदवार होते, मात्र काही सामाजिक कारणांमुळे त्यांना मागे रहावं लागलं. तरीदेखील त्यांच्या कार्याची गती आणि जनसेवेची ओढ कायम राहिली.
मा. माजी मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार खेडेकर साहेब यांच्या सहकार्याने जि.प. व पं.स. सर्कलमध्ये त्यांनी अनेक सामाजिक आणि विकासकामे पूर्ण केली.

स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. बँक, तहसील, पंचायत समिती, वीज वितरण मंडळ अशा विविध विभागांमधील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी तातडीने सोडवले. ट्रान्सफॉर्मर बदलणे, सिंगल फेज लाईन, पूल आणि रस्त्यांची कामं — ही सर्व कामं तीन दिवसांत पूर्ण करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. आणि या कामांदरम्यान शेतकऱ्यांकडून चहा सुद्धा न घेणं — हीच त्यांच्या कार्यशैलीची ओळख आहे.

शिवसेनेच्या विचारधारेत राहून जनतेचा विश्वास जपणे, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणे आणि गावागावात विकासाचा दीप प्रज्वलित करणे — हेच विलास विघ्ने यांचे ब्रीद आहे.
“सत्ता आली नाही तरी चालेल, पण समाजाचा विश्वास ढळू नये — हेच खरं नेतृत्व!” — या विचारानेच ते आजही जनतेच्या मनात आपले स्थान टिकवून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!