
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे संत सावता स्कूलमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांचा भव्य सत्कार
विशेष प्रतिनिधी सिंदखेडराजा
मातृतीर्थ, सिंदखेडराजा | दिनांक 27/12/2025 रोजी मातृतीर्थ येथील संत सावता स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. शाळेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम जाधव सर यांच्या हस्ते नगराध्यक्ष सौरभ तायडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण, शिस्त, समाजसेवा आणि नेतृत्वगुण यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून सातत्याने मेहनत केल्यास यश नक्की मिळते, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात शाळेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम जाधव सर यांनीही विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. शिक्षण हे जीवन घडवणारे प्रभावी साधन असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ भाऊ तायडे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास शाळेच्या संचालिका सौ. जयश्री ताई जाधव, नवनिर्वाचित नगरसेवक दिपक ठाकरे सर, माजी नगरसेवक गणेश झोरे, संजय मेहेत्रे, शहाजी मेहेत्रे, अभिजित मेहेत्रे, जय व्यवहारे, रितेश सोनटक्के, विष्णू गोरे, योगेश मेहेत्रे, अभिषेक वायकोस, राहुल धडके यांची उपस्थिती होती. तसेच शाळेचे प्राचार्य सुधाकर गोफणे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी—वैष्णवी अंभोरे, तेजराव घुगे, रुख्मिणी तौर, पायल पवार, दिपाली सातपुते, पल्लवी जाधव, संगिता खरात, मनिष बुंधे—विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व प्रेरणा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.




