देऊळगाव राजाबुलढाणामहाराष्ट्रराजकीयशेतकरीशेती

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक हालचालींना गती

प्रकाश गिते यांची बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी धडाकेबाज नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक हालचालींना गती

प्रकाश गिते यांची बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी धडाकेबाज नियुक्ती

सिंदखेड राजा प्रतिनिधी : अनिल दराडे

बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवसंजीवनी देणारी एक महत्त्वाची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहॉंगीर येथील पक्षाचे निष्ठावंत, तळागाळातील कार्यकर्ते तथा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे प्रकाश भिवाजी गिते यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीवर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती बुलढाणा जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे जाहीर केली. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक हालचालींना वेग येणार असून, राजकीय वर्तुळातही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नियुक्तीपत्रात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुलभाई पटेल, प्रांताध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री व कार्याध्यक्ष ना. मकरंद आबा पाटील यांच्या विचारधारेचा प्रसार व पक्षसंघटन मजबुतीसाठी प्रभावी काम करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे प्रकाश गिते यांनी यापूर्वी शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेतच ही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला असून, शेतकरी लढ्यांमध्ये ते नेहमी आघाडीवर राहिले आहेत. पाणीप्रश्न, पीकविमा, कर्जमाफी, बाजारभाव आदी विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.

सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात त्यांचे काम प्रामाणिक व तळागाळात पोहोचलेले असल्याने पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सिंदखेड राजा तालुका तसेच बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

या नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी प्रकाश गिते यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!