नगरपरिषदराजनीतिलोकल न्यूज़

भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला

तेल्हारा नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानंतर

भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला

      तेल्हारा | प्रतिनिधी : राजेश पाटील खारोडे

तेल्हारा नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानंतर दि. १ जानेवारी २०२६ रोजी नगर परिषद आवारात नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवक/नगरसेविकांचा पदग्रहण व आभार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी भूषविले तर प्रमुख मार्गदर्शन युवा खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष संतोषजी शिवरकर, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ. जयश्रीताई पुंडकर, जिल्हा उपाध्यक्ष गजाननभाऊ उंबरकार, जिल्हा सचिव डॉ. संजयजी शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच माजी नगराध्यक्ष मूलचंदजी राठी, मंडळ अध्यक्ष मूलचंदजी राठी, अकोट मंडळ अध्यक्ष गोपालभाऊ मोहोड, योगेश बलोदे, अनिलभाऊ पोहने, रुपेशभाऊ राठी, प्रा. सुधाकरजी येवले, ताराचंदजी पालिवाल, कुलदीप तराळे, तालुका सरचिटणीस रामेश्वरजी हागे, लखन बगाडे, महिला आघाडी मंडळ अध्यक्षा मोनिकाताई वाघ, उद्योजक सिध्दार्थजी रुहाटिया, उमेशजी राठी आदी उपस्थित होते.
या सोहळ्यात नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. वैशालीताई पालिवाल तसेच हिवरखेड नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ. सुलभाताई दुतोंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सतिषजी जयस्वाल, सौ. अरुणाताई ठाकरे, नगरसेवा समितीचे अध्यक्ष विजयसिंहजी बलोदे, गटनेते अतुलभाऊ विखे, साक्षीताई वानखडे (पांडव), अमितभाऊ अग्रवाल, सौ. भक्तीताई छांगाणी, जितेंद्रजी राठी, सौ. गायत्रीताई सोळंके, सौ. संध्याताई गावत्रे, रुपेशभाऊ चव्हाण, सौ. रुपालीताई हागे, सचिनभाऊ तायडे, सौ. जयाताई बघ्घन, प्रविणभाऊ ढोके यांनी पदग्रहण केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना शुभेच्छा देत तेल्हारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संदेश दिला. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला आघाडी, शेतकरी सहकार संघटना, नगरसेवा समितीचे कार्यकर्ते तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह व जल्लोषाच्या वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!