
जिल्हा नाशिक येथे महानगरपालिका सार्वत्रिक मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात
नाशिक–येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी संपून आज दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे. शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून लोकशाहीचा उत्सव मोठ्या शांततेत आणि शिस्तीत साजरा होत आहे.
मखमलाबाद नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ६ मधील मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांची गर्दी दिसून आली. येथील उमेदवार सौ. कल्पनाताई शिवाजी पिंगळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे आदरपूर्वक स्वागत केले. “मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे” या भावनेतून प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन त्या करत आहेत.
सौ. कल्पनाताई पिंगळे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्या वार्डातील नागरिकांच्या अडी-अडचणींमध्ये नेहमीच धावून जाणाऱ्या, मदतीचा हात देणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिलांचे प्रश्न, शेतकरी व सामान्य नागरिकांचे प्रश्न याबाबत त्या सातत्याने पाठपुरावा करत असल्याने त्यांच्याबाबत मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण आहे.
“वार्ड क्रमांक ६ चा सर्वांगीण विकास करणे, मूलभूत सुविधांना प्राधान्य देणे आणि पारदर्शक प्रशासन देणे” हा आपला संकल्प असल्याचे सौ. पिंगळे यांनी यावेळी सांगितले. मतदारांचा कौल आपल्याला मिळेल आणि विजयी होऊन मखमलाबाद वार्डाचा विकास साधता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सौ. कल्पनाताई शिवाजी पिंगळे यांनी स्वतः मतदान करून सर्व नागरिकांना आवाहन केले की,
“मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे, तुम्हीही सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही बळकट करा.”
महानगरपालिका निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी तैनात असलेल्या पोलीस प्रशासनाचेही आभार त्यांनी मानले. एकूणच नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह, जागरूकता आणि सहभागाची भावना दिसून येत असून, मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे.




