नाशिकमहाराष्ट्रमहिलासामाजिक कार्यकर्ते

नाशिकमध्ये आजपासून शिवरायांचा पराक्रम व मावळ्यांचे शौर्य उलगडणारा शिवकालीन इतिहास कार्यक्रम

इतिहास केवळ पुस्तकांमध्ये बंदिस्त नसून तो अनुभवातून समजतो, जिवंतपणे पाहिला की त्याचे मोल कळते—हेच

नाशिकमध्ये आजपासून शिवरायांचा पराक्रम व मावळ्यांचे शौर्य उलगडणारा शिवकालीन इतिहास कार्यक्रम

      नाशिक | येवला | प्रतिनिधी : प्रविण पाटील

इतिहास केवळ पुस्तकांमध्ये बंदिस्त नसून तो अनुभवातून समजतो, जिवंतपणे पाहिला की त्याचे मोल कळते—हेच अधोरेखित करणारा “शिवरायांचा पराक्रम व मावळ्यांचे शौर्य – शिवकालीन शस्त्रास्त्र इतिहास” हा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम आजपासून नाशिकमध्ये सुरू होत आहे.

या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्वितीय नेतृत्व, स्वराज्यासाठी दिलेला संघर्ष, मावळ्यांचे अपार शौर्य आणि त्याग यांचा इतिहास नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. शिवकालीन तलवारी, भाले, ढाली, तोफा, युद्धातील उपयोगी साधने, नाणी तसेच त्या काळातील युद्धकलेची माहिती अत्यंत अभ्यासपूर्ण व वास्तवदर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे.

ही केवळ एक साधी प्रदर्शनी नसून, स्वाभिमान जागवणारा, राष्ट्रप्रेम चेतवणारा आणि तरुण पिढीला प्रेरणा देणारा जिवंत इतिहास असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे. आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि डिजिटल जगात हरवलेल्या पिढीला आपल्या पराक्रमी इतिहासाशी जोडण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

विशेषतः विद्यार्थी, शिक्षक, इतिहास अभ्यासक, संशोधक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी वर्गासह, शाळा-महाविद्यालयीन सहलींच्या माध्यमातून आणि कुटुंबीयांसोबत या कार्यक्रमाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अभ्यासक्रमातील इतिहासापलीकडे जाऊन शिवरायांचा विचार, त्यांची युद्धनीती, राज्यकारभाराची दृष्टी आणि मावळ्यांची निष्ठा समजून घेण्याची ही दुर्मिळ संधी असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हा प्रेरणादायी शिवकालीन इतिहास कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज इनडोअर स्टेडियम,

सागर आप्पा आढाव चौकाजवळ, इंदिरा गांधी पुतळ्यासमोर,

आढाव नगर, दसक, जेल रोड, नाशिक रोड येथे

दि. ९ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत

दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

नागरिकांनी मित्रपरिवारासह, कुटुंबासह तसेच शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांचा तेजस्वी वारसा अनुभवावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

इतिहास जपा… इतिहास जगा…

शिवरायांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!