E-Paperhttps://shetkarinews.live/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifUncategorizedछत्तीसगढ़टेक्नोलॉजीटॉप न्यूज़दिल्ली NCRदुनियादेशमहाराष्ट्रयुवायूपीराजनीतिराजस्थानराज्यलोकल न्यूज़

दोनच दिवसापूर्वी बैलपोळा हा अतिशय महत्त्वाचा सण आनंदात शेतकऱ्यांनी साजरा केला पण दुर्दैवाने दिनांक. २४ ऑगस्ट रोजी शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आणि शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळा

  1. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बैल जोडी जळून खाक शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर

विशेष प्रतिनिधी. बुलढाणा

  • दोनच दिवसापूर्वी बैलपोळा हा अतिशय महत्त्वाचा सण आनंदात शेतकऱ्यांनी साजरा केला पण दुर्दैवाने दिनांक. २४ ऑगस्ट रोजी शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आणि शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळा

दिनांक 24 ऑगस्ट रोजी अटकळ ता. बुलढाणा येथील दत्तात्रायभाऊ लक्ष्मणराव खोंडे यांच्या गोठ्याला काल रात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली असून या दुर्घटनेत त्यांचे दोन बैल आणि गोठा जळून खाक झाला.यामुळे त्यांचे भयंकर नुकसान झाले आहे. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)प्रवक्ता मा. जयश्रीताई शेळके यांनी मा. तहसीलदार साहेब बुलढाणा तसेच मा. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी विनंती केली.

यावेळी दत्ताभाऊ यांचे डोळे भरून आले आणि फक्त एकच शब्द वापरला ताई शेती कशी करावी शेतकऱ्याला सतत संकटच आहे कधी वल्ला दुष्काळ तर कधी रोगाचे साम्राज्य आणि कधी हे असं आणि शेतकऱ्याच्या डोळ्यांमधून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या आणि बोलणं थांबवलं यावेळी उपस्थित

तलाठी नितीनभाऊ आहेर,

गावातील तानाजीभाऊ कोल्हे, अरुणभाऊ शेळके, गजाननभाऊ राऊत, संदीपभाऊ पैठणे, भारतभाऊ पवार, रामदासभाऊ चव्हाण, नंदारामभाऊ राजपूत, दिपकभाऊ शेळके, सोनूभाऊ शेळके, विशालभाऊ शेळके, शुभमभाऊ खोंडे, विकासभाऊ खोंडे, अनिकेतभाऊ खोंडे, गजानन भाऊ खोंडे, मनोहरभाऊ खोंडे, राजूभाऊ खोंडे, छानसिंग भाऊ बिबे, बाबुरावभाऊ गायकवाड यांच्यासह गावातील मंडळी व शेतकरी उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!