शेतकरी चळवळीच्या धगधगत्या प्रवासातून उदयास आलेले नेतृत्व — विकास उगले यांची पंचायत समितीसाठी प्रभावी घोषणा!”

“शेतकरी चळवळीच्या धगधगत्या प्रवासातून उदयास आलेले नेतृत्व — विकास उगले यांची पंचायत समितीसाठी प्रभावी घोषणा!”
विशेष प्रतिनिधी, मुंबई
सिंदखेडराजा तालुक्यातील पांग्री उगले गावातील तरुण नेतृत्व विकास श्रीराम उगले यांनी पंचायत समिती निवडणुकीची उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर करत ग्रामविकासासाठी नवीन दिशा देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
विकास उगले हे मुळात शेतकरी घराण्यात वाढलेले. बालवयापासूनच शेतकरी चळवळीच्या बोलक्या संघर्षाचे ते साक्षीदार. आदरणीय शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकले आणि तेव्हापासून शेतकरी प्रश्नांवर सातत्याने लढा देत आले आहेत.
“मी स्वतः मातीशी जोडलेला माणूस आहे. शेतकऱ्यांची कळकळ, समस्या आणि जगण्याची झुंज माझ्या प्रत्येक श्वासात आहे. आजवर केलेला संघर्ष हे फक्त सुरुवात होती… पुढेही शेतकऱ्याचा आवाज अधिक ताकदीने शासनापर्यंत पोहोचवणार आहे. संधी द्या — माझी वचनं तुम्हाला कामातून दिसतील,” असे उद्गार त्यांनी व्यक्त केले
ग्रामविकासासाठी त्यांनी चार महत्त्वाच्या दिशा पुढे केल्या आहेत —
• मूलभूत सोयी-सुविधांचे मजबुतीकरण• गावोन्नतीसाठी ठोस विकास प्रकल्प• पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन , लोकसहभागावर आधारित सर्वसमावेशक कार्यपद्धती
यासोबतच लवकरच गावाचा सर्वसमावेशक विकास आराखडा जाहीर करून तो प्रत्यक्षात उतरवण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली.
“आदरणीय रविकांत भाऊ तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी चळवळ अधिक भक्कम करण्यासाठी पुढेही निष्ठेने काम करणार आहे,” असा विश्वास त्यांनी जनतेला दिला.
विकास श्रीराम उगले
पांग्री उगले, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा




