अपघातपाऊसपाणीपोलीसबुलढाणामहाराष्ट्रविदर्भशेतकरीसामाजिक कार्यकर्ते

जोडधंदा म्हणून मेंढ्या सांभाळल्या… पण निसर्गाने त्या सुद्धा हिरावून घेतल्या…”

काल दिनांक २५ मे रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या दरम्यान वारा, पाऊस व गारपिटीमुळे शिवनी आरमाळ ता. देऊळगाव राजा येथे

“जोडधंदा म्हणून मेंढ्या सांभाळल्या… पण निसर्गाने त्या सुद्धा हिरावून घेतल्या…”

काल दिनांक २५ मे रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या दरम्यान वारा, पाऊस व गारपिटीमुळे शिवनी आरमाळ ता. देऊळगाव राजा येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली. मेंढपाळ शेतकरी श्री. सोनाजी रामभाऊ खताळ रा. कोण्टी ता. खामगाव हे आपल्या मेंढ्या घेऊन धरण परिसरात चारण्यासाठी आले होते. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे झाड कोसळून झाडाखाली आसरा घेतलेल्या मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत ६ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, मात्र झाड मोठे असल्यामुळे मृत मेंढ्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आधीच कर्जबाजारी, पीक विम्यापासून वंचित असलेला शेतकरी जोडधंदा म्हणून मेंढ्या सांभाळत होता, पण निसर्गाने सुद्धा त्यांची साथ सोडली. या घटनेनंतर शेतकरी पूर्णपणे हतबल झाला असून अद्याप प्रशासनाकडून कुठलीही मदत किंवा विचारपूस झालेली नसल्याची माहिती मिळत आहे.

प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, हीच मागणी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!