पिक विमा द्या नाहीतर 29 तारखेला महाराष्ट्र पेटेल… ही लढाई आरपारची आणि शेवटची ठरेल!”
दरम्यान, लोणार तालुक्यातील शेतकरी योद्धा कृती समितीने या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

पिक विमा द्या नाहीतर 29 तारखेला महाराष्ट्र पेटेल… ही लढाई आरपारची आणि शेवटची ठरेल!”
बुलढाणा, विशेष प्रतिनिधी रघुनाथजी आघाव :
खरीप 2025 मध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीने शेतकऱ्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले… शेतात उभे असलेले स्वप्न वाहून गेले, कुटुंबाच्या आशा कोसळल्या. शासनाने नुकसान मान्य केले, मदतही दिली… पण आजही पिक विम्याचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या हातात आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने सरकारला अंतिम इशारा देण्यात आला आहे –
“ही आमची शेवटची लढाई आहे!”
दरवेळी आंदोलन करायची वेळ शेतकऱ्यांवर येत असेल, तर सरकारनेही लक्षात ठेवावे — यानंतर शेतकरी शांत बसणार नाही.
“एकतर आम्हाला आमचा हक्काचा पिक विमा द्या… नाहीतर महाराष्ट्रात ही पिक विमा योजना कायमची बंद करा!”
यापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केले, उपोषण केले, पाण्याच्या टाकीवर संघर्ष केला… पण आजपर्यंत ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
यावेळी शेतकरी नेते बालाजी सोसे यांनी ठाम इशारा दिला —
“29 एप्रिलपर्यंत न्याय द्या… नाहीतर ही लढाई शेवटची आणि निर्णायक ठरेल.”
तर शेतकरी नेते प्रवीण भाऊ गीते यांनी सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवत म्हटले —
“शेतकरी स्वतःच्या पैशातून पिक विमा भरतो, पण नुकसान झाल्यावर कंपनी नकार देते, हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. सरकार व कंपन्यांच्या या व्यवस्थेला आता उत्तर द्यावेच लागेल.”
लोणार तालुक्यातून आंदोलनाला जाहीर पाठिंबा
दरम्यान, लोणार तालुक्यातील शेतकरी योद्धा कृती समितीने या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
लोणार येथे संस्थापक उपाध्यक्ष रघुनाथ आघाव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार भुषण पाटील यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी विशेष उपस्थिती निवेदन देताना श्री अमोल पाटील सुलताने बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व इतर मान्यवर
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, 2025 मधील अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने मदत दिली असली तरी पिक विमा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा परिसरातील शेतकरी सतत पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे.
समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की,
29 एप्रिल 2026 पर्यंत पिक विमा न मिळाल्यास सिंदखेड राजा येथे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण छेडण्यात येईल.
तसेच 1 मे महाराष्ट्र दिन ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येईल आणि राज्यभर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात येईल.
अंतिम इशारा
“हे आंदोलन केवळ एका तालुक्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरेल. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीस पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील,” असा स्पष्ट इशारा शेतकरी योद्धा कृती समितीने दिला आहे.
निवेदनावेळी उपस्थिती
यावेळी निवेदन देताना शेतकरी नेते बालाजी सोसे, प्रवीण भाऊ गीते, गजानन जायभाये, गणेश मुंडे, देवानंद सोसे, मधुकरराव शिंदे, विलास वाघ, आकाश खरात, शेख अत्तर, ज्ञानेश्वर कायदे (माजी सरपंच) व किनगाव राजा दीपक साळवे तसेच लोणार तालुका शेतकरी योद्धा कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
समाप्त
ही केवळ लढाई नाही… ही शेतकऱ्याच्या अस्तित्वाची शेवटची हाक आहे!
“29 एप्रिल – निर्णय नाहीतर महाराष्ट्र पेटणार!”




