क्राइमपोलीसबुलढाणामहाराष्ट्रशेतकरीशेतकरी आत्महत्याशेतीसरसकट कर्जमाफीसामाजिक कार्यकर्तेसिंदखेड राजा

कर्जाच्या विळख्यात आणखी एका बळीराजाचा बळी; सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या, कुटुंबीयांचा कर्जबाजारीपणाचा आरोप

शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन या कुटुंबाला न्याय आणि मदत द्यावी,

कर्जाच्या विळख्यात आणखी एका बळीराजाचा बळी; सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या, कुटुंबीयांचा कर्जबाजारीपणाचा आरोप

विशेष प्रतिनिधी किनगाव राजा

सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवणी येथील शेतकरी कैलास अर्जुन सानप (वय ४५) यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुःखद घटना समोर आली आहे.

मृत शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज असल्याचे सांगत, कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, भाऊ व इतर नातेवाईक असा परिवार आहे. या कठीण प्रसंगी सानप कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण गाव व शेतकरी बांधव सहभागी आहेत.

भावपूर्ण श्रद्धांजली.

शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन या कुटुंबाला न्याय आणि मदत द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, संबंधित बाबींची चौकशी प्रशासनाकडून होणे अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!