26 जानेवारी 2026टॉप न्यूज़दुनियापळसखेड चक्कापोलीसमहाराष्ट्रराज्य

तेल्हारा आगारात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; सुरक्षित सेवेचा गौरव व नफ्याच्या कामगिरीचा अभिमान

तेल्हारा : भारतीय संविधानाच्या अमलाची आठवण करून देणारा २६ जानेवारी

तेल्हारा आगारात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; सुरक्षित सेवेचा गौरव व नफ्याच्या कामगिरीचा अभिमान

  तेल्हारा तालुका प्रतिनिधी : राजेश पाटील खारोडे

तेल्हारा : भारतीय संविधानाच्या अमलाची आठवण करून देणारा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन तेल्हारा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या (रा. प.) आगारात अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व गौरवशाली वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात आगार व्यवस्थापक श्री. मिथुन रा. शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहणानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करून देशाप्रती आपली निष्ठा, एकात्मता व कर्तव्यभावना व्यक्त केली. यावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आगारातील १५ व ३० वर्षे अपघातविरहित, सुरक्षित, निष्ठावान व प्रामाणिक सेवा बजावलेल्या एकूण २० चालक कर्मचाऱ्यांचा “सुरक्षित सेवेचा बिल्ला” व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य व प्रेरणा निर्माण झाली.

याप्रसंगी आगार व्यवस्थापकांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सेवा देणारे चालक व कर्मचारी हे रा. प. महामंडळाची खरी ताकद आहेत. आगार सलग दोन महिने नफ्यात राहणे ही सर्व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक मेहनतीची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.

भविष्यातही प्रवाशांना सुरक्षित, वेळेत, दर्जेदार व विश्वासार्ह सेवा देत रा. प. महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी सर्वांनी संघभावनेने व जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास आगारातील अधिकारी, चालक, वाहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत, शिस्तीत व उत्साहात पार पडला.

— तेल्हारा तालुका प्रतिनिधी : राजेश पाटील खारोडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!