क्राइमटॉप न्यूज़दुनियादेशमहाराष्ट्र

मंगरुळपीर तालीक्यातील नागी येथे तीन ठिकाणी घरफोडी ९.३५ लाखांचा मुद्देमाल लंपास

मंगरुळपीर तालीक्यातील नागी येथे तीन ठिकाणी घरफोडी ९.३५ लाखांचा मुद्देमाल लंपास

वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे

मंगरुळपीर तालुक्यातील नागी
(इचा) येथे २४ डिसेंबरच्या रात्री तीन ठिकाणी धाडसी घरफोडीच्या घटना घडल्या. अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून ९ लाख ३५ हजार रुपयांचा ५०० मुद्देमाल लंपास केला.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना चोरट्यांनी मोहन रामदास राऊत यांच्या घरात शिताफीने प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर फोडले.

उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर, ठाणेदार किशोर शेळके, श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट दिली
त्यातील ९० ग्रॅम सोन्याचे दागिने (४ लाख ५० हजार) व ३० हजार रुपये रोख असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्याच रात्री राजेश अमृतराव राऊत यांच्या

घरातून ५६ ग्रॅम सोन्याचे दागिने (२ लाख ८० हजार) व ३ हजार रुपये रोख, तर प्रदीप ऊर्फ दीपक विठ्ठलराव राऊत यांच्या घरातून ३३ ग्रॅम सोन्याचे दागिने (१ लाख ६५ हजार) व ७ हजार ५०० रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!