टॉप न्यूज़नगरपरिषदमहाराष्ट्रवाशिम

नगर परिषद कारंजा (लाड) भाजप गटनेतेपदी सौ. शालिनी प्रशांत ठाकरे यांची निवड.

कारंजा (लाड) नगर परिषद येथील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या बैठकीत भाजप गटनेतेपदी

नगर परिषद कारंजा (लाड) भाजप गटनेतेपदी सौ. शालिनी प्रशांत ठाकरे यांची निवड.

          वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे

कारंजा (लाड) नगर परिषद येथील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या बैठकीत भाजप गटनेतेपदी सौ. शालिनी प्रशांत ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. ही बैठक आमदार सईताई डहाके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तसेच भाजपा वाशीम जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी चितलांगे आणि महामंत्री राजीव पाटील काळे

माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. या बैठकीस नगर परिषदेमधील भाजपचे सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने व नगरपरिषदेमध्ये विकासाभिमुख भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी अनुभवी व सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज असल्याने सौ. शालिनी ठाकरे यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.

सौ. शालिनी प्रशांत ठाकरे यांनी यापूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून प्रभावी कामकाज केले आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय संपादन केला असून, गेल्या वीस वर्षांपासून स्व. प्रकाशदादा डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाशी एकनिष्ठ राहून सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक, राजकीय अनुभवाची व संघटनात्मक बांधिलकीची दखल घेत त्यांची भाजप गटनेतेपदी निवड करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. निवडीनंतर बोलताना आमदार सईताई डहाके यांनी सौ. शालिनी ठाकरे यांचे अभिनंदन करत नगर परिषदेमध्ये जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडून विकासकामांना गती देण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच भाजपा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली कारंजा (लाड) शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. या निवडीमुळे नगर परिषद कारंजा (लाड) मध्ये भाजपचे नेतृत्व अधिक सक्षम झाले असून आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!