शेतकरी योद्धा कृती समितीचा पहिला विजय! देवानंद सोसे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
विशेष म्हणजे, निवड होताच कामाला सुरुवात करत नवनिर्वाचित समितीने शाळा परिसरातील घाणीचे साम्राज्य जेसीबीच्या साहाय्याने तात्काळ हटवून स्वच्छता केली.

शेतकरी योद्धा कृती समितीचा पहिला विजय! देवानंद सोसे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
रघुनाथ आघाव | लोणार तालुका प्रतिनिधी
पळसखेड चक्का : जि. प. उच्च प्राथमिक शाळा, पळसखेड चक्का येथे आयोजित पालक सभेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक सदस्य श्री. देवानंद विष्णू सोसे यांची अध्यक्षपदी, तर सौ. रूपालीताई संदीप मुंढे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

विशेष म्हणजे, निवड होताच कामाला सुरुवात नवनिर्वाचित समितीने शाळा परिसरातील घाणीचे साम्राज्य जेसीबीच्या साहाय्याने तात्काळ हटवून स्वच्छता केली. तसेच गावातील दोन वस्त्यांमधून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई–नागपूर महामार्गालगतून जावे लागते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या कडेला वाढलेले मोठमोठे गवत व झुडपेही जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली.
निवडीनंतर लगेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या कामाची ही पहिली पायरी ठरली आहे.
शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या शेतकरी योद्धा कृती समितीने आता शैक्षणिक क्षेत्रातही आपले पहिले पाऊल टाकले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शाळेतील स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता यासाठी समितीच्या माध्यमातून प्रभावी काम करण्याची अपेक्षा पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
नवनिर्वाचित समिती अध्यक्ष: श्री. देवानंद विष्णू सोसे उपाध्यक्ष: सौ. रूपालीताई संदीप मुंढे
सदस्य: सौ. पल्लवीताई गोपाल धायतडक, श्री. प्रवीण सुखदेव जाधव, सौ. वर्षाताई श्रीकृष्ण मुंढे, सौ. संजीवनी सचिन मुंढे, श्री. रामेश्वर दिनकर मुंडे, श्री. एकनाथ प्रल्हाद काकड आणि सौ. शिवकन्या पांडुरंग सोसे.
देवानंद सोसे यांच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रभावी काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे पालक, ग्रामस्थ, शिक्षक तसेच शेतकरी योद्धा कृती समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून हार्दिक अभिनंदन!




