महारखेड परिसरात अवैध दारूधंद्यांचा उच्छाद! गावात तणाव, कुटुंबांत फूट — प्रशासनाचा संशयास्पद मौन

महारखेड परिसरात अवैध दारूधंद्यांचा उच्छाद! गावात तणाव, कुटुंबांत फूट — प्रशासनाचा संशयास्पद मौन
शेतकरी न्यूज, मुख्य संपादक श्री बालाजी सोसे
शेतकरी क्रांतिकारी संघटनेचा इशारा : “धंदे बंद नाही झाले तर तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन”**
महारखेड (ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) या गावासह आसपासच्या परिसरामध्ये गेल्या दहा वर्षांपासून अवैध देशी दारूचे अनेक धंदे उघडपणे सुरू असून, प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे नेते श्री. किसन नागरे यांनी केला आहे.
व्यसनामुळे कुटुंबांत कलह – गावात दररोज तणावाचे वातावरण
अवैध दारूमुळे गावात सतत नवरा–बायको, आई–वडील, मुलं–पालक, भाऊ–बहिणी, नातेवाईक, मित्रमंडळी आणि दोन समाजांमध्येही तिढा निर्माण होत आहे. कुटुंबाची एकता तुटत चालली असून गावात अस्वस्थता वाढत आहे.
तरुण पिढी व्यसनाच्या जाळ्यात
गावात परवान्याशिवाय चालणारी 3–4 देशी दारूची दुकानं १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना व्यसनाच्या खाईत ढकलत आहेत. शेतकरी कुटुंबातील तरुण पिढी धोक्यात असल्याचे नागरे यांनी सांगितले.
पोलिसांना तोंडी माहिती दिली – तरीही कारवाई नाही!
काही दिवसांपूर्वी नागरे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन तोंडी माहिती दिली होती, की गावामध्ये अवैध दारूचे धंदे उघडपणे सुरू आहेत.
तरीसुद्धा पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा नागरे यांनी रोष व्यक्त केला.

याशिवाय त्यांनी थेट आरोप केला की
“संबंधित पोलीस अधिकारी अवैध दारू विक्रेत्यांकडून हप्ते घेत आहेत.”
या प्रकरणाची सविस्तर माहिती त्यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही दिली आहे.
“दारू बंद झाली तर गाव आदर्श गाव बनेल” — नागरे
गावाला शांत, सुसंस्कृत आणि दारूमुक्त करण्यासाठी नागरे म्हणाले—
“दारूधंदे बंद झाले तर महारखेड गाव आदर्श गाव होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही.”
तीव्र इशारा – धंदे बंद नाही झाले तर आंदोलन
नागरे यांनी स्पष्ट चेतावणी दिली:
“अवैध दारूधंदे बंद न झाल्यास सिंदखेडराजा तहसील कार्यालयात रिसर्च निवेदन देणार आणि त्यानंतर ठिय्या आंदोलन छेडले जाईल.”
गोरगरीब शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या या अवैध धंद्यांवर कारवाई करणे प्रशासनाचे कर्तव्य असून आता अधिकारी जागे होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशी माहिती नागरे यांनी शेतकरी न्यूज सोबत फोनवरून बोलताना सांगितले



