कॉलेज शाळाबुलढाणामहाराष्ट्रशाळे कॉलेजसिंदखेड राजा

विद्यार्थी जीवनातील ध्येय निश्चित असेल,तर यश नक्की मिळणार-

सहाय्यक संचालक शितल गायकवाड यांचे प्रतिपादन

विद्यार्थी जीवनातील ध्येय निश्चित असेल,तर यश नक्की मिळणार-

सहाय्यक संचालक शितल गायकवाड यांचे प्रतिपादन

             प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा 

ग्रामीण भागातील विद्यार्थी संघर्ष आणि परिस्थितीचे कारण दाखवून अभ्यासातील मेहनती पासून दूर जात असतात परंतु विद्यार्थी तसे, तर यश तुमच्या पदरात नक्कीच येईल त्यामुळे मला हे करायचं असं ठरवून हे निश्चित करा असे प्रतिपादन माजी विद्यार्थी तथा छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत असलेल्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक शितल गायकवाड यांनी केले

जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील जीवन विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित स्नेहसंमेलन समारंभातील दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या महिला मेळावा हळदी व हळदी कुंकू कार्यक्रमात महिला पालक व विद्यार्थ्यांना उद्घाटक म्हणून, महिला पालक व विद्यार्थ्यांना संबोधित करताना शितल गायकवाड बोलत होत्या

पुढे बोलताना त्यांनी स्वतःच्या संघर्षमय परिस्थितीचा इतिहास सांगून विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी अनेक किस्से आपल्या जीवनातील सांगितले अतिशय पोट तिडकीने बोलत असताना मी सांगितलेल्या गोष्टींच्या अनुकरण करा आणि नक्कीच यश प्राप्त करा असे आवाहनही त्यांनी केले.जीवन विकास विद्यालयाच्या प्रांगणात पाय ठेवत असताना माझे मन भारावून गेले असून मला शिकविणाऱ्या शिक्षकांची अंतर्मनातून आठवण येत असून शाळेने दिलेल्या गोष्टींमुळेच मी या पदावर पोहोचली असल्याचे शितल गायकवाड यांनी शेवटी सांगितले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर होते, तर राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग मध्ये प्रथम मानांकन मिळवणाऱ्या सत्कारमूर्ती आरती खंडागळे, लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव देशमुख शाळा समिती अध्यक्ष किसनराव बापू देशमुख, माजी सरपंच बाळासाहेब मोहिते,सौ.रजनीताई शिंदे, संगीता ताई मोहिते, सौ प्रणिता ताई देशमुख, सरपंच सरस्वती ताई मखमले, पोलीस पाटील उर्मिला मखमले, याकूब भाई शेख, प्राचार्य गणेश भांगे, उप प्राचार्य रवींद्र धनावत, पर्यवेक्षक डी.एल वायाळ सर,महिला शिक्षक प्रतिनिधी सौ थेटे मॅडम, श्रीमती गुजर मॅडम सविता देशमुख मॅडम शितल आटोळे मॅडम वर्षाताई देशमुखआदींची उपस्थिती होती

यावेळी मान्य ठाणेदार यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले तर प्रथम मानांकन बॉक्सिंग विजेते आर्थिक खंडागळे यांचा सत्कार ही संस्था आणि शाळा महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला यावेळी त्यांनी सुद्धा खेळाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी, आकर्षक, नृत्य नाटिका, व विविध दर्शनातून स्नेहाला संमेलनात सहभाग दर्शविला

प्रास्ताविक, प्राचार्य भांगे सर यांनी केले तर सूत्र संचालन ज्ञानेश्वर राजे जाधव व विज्ञान प्रा.दिलीप काकडे यांनी केले

स्नेहसंमेलन प्रमुख जि.ओ.देशमुख सर, प्रा.तरवडे,सांस्कृतिक प्रमुख ज्ञानेश्वर राजे,प्रा.दिलीप काकडे यांनी अतिशय सुंदर नियोजन केल्याने स्नेहसंमेलनाचा दुसरा दिवस अतिशय अतिशय आकर्षक ठरला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!