काल सिंदखेड राजा येथे पारंपरिक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साह पोळा सण साजरा

-
काल सिंदखेड राजा येथे पारंपरिक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साह पोळा सण साजरा
सिंदखेड राजा येथे, अत्यंत साध्या घरगुती पद्धतीने पोळा सण साजरा करण्यात आला. सध्या परिस्थितीमध्ये लंपिंक आजाराचे सावट असल्यामुळे, जनावरांना हा रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशाचे पालन करून, बैल पोळा हा शेतकऱ्यांचा, बैलांचा आणि श्रमांचा उत्सव साजरा करणारा सण आहे, शेतकरी आणि बैल यांच्या कष्टाने देश उभा राहतो, ज्या बैलांच्या कष्टामुळे शेतात सोन पिकतं त्या बैलांच्या पूजनांचा हा दिवस,आज महाराष्ट्रभर पोळा सण उत्साहाने साजरा होत आहे. शेतकरी जगला तरच देश वाचेल, असे अनेक नेते सांगतात, पण बैल वाचला तरच शेती वाचणार आहे,रासायनिक शेती बंद करा व जनावरांच्या पारंपारिक शेती करा,असे आवाहन शेतकरी नेते दिलीप चौधरी यांनी केले.पोळ्याच्या शुभेच्छा देताना,त्यांच्या कुटुंबासोबत पोळा साजरा करताना शेतकरी मित्र दिलीप चौधरी यांनी संबोधित केले आहे कुटुंबप्रमुख जानकीराम चौधरी ,वाय बी चौधरी ,गंगाधर चौधरी ,सुधाकर चौधरी ,भिवसान चौधरी ,रमेश चौधरी ,सतीश चौधरी, आधी चौधरी सहकुटुंब घरगुती पद्धतीने पोळा सण साजरा केला, आणि पुढील वर्षाच्या सर्व शेतकऱ्यांना शेतकरी नेते दिलीप भाऊ चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या