जयंतीधर्ममहाराष्ट्रयात्रा महोत्सववाशिम

चिखलीत संत झोलेबाबा पुण्यतिथीला भक्तीचा महापूर; हजारो भाविकांनी घेतला भव्य महाप्रसादाचा लाभ

मंगरुळपीर तालुक्यातील श्रीक्षेत्र चिखली येथे संत झोलेबाबा यांच्या ६१ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त

चिखलीत संत झोलेबाबा पुण्यतिथीला भक्तीचा महापूर; हजारो भाविकांनी घेतला भव्य महाप्रसादाचा लाभ

       वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे

मंगरुळपीर तालुक्यातील श्रीक्षेत्र चिखली येथे संत झोलेबाबा यांच्या ६१ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अख्खी चिखली नगरी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली. सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.

संत झोलेबाबा पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने २७ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या काळात दररोज पहाटे काकडा भजन, सकाळ-संध्याकाळ बाबांची आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, भारुड तसेच श्रीहरी कीर्तन अशा कार्यक्रमांनी भक्तिभावाला उधाण आले होते.

३ जानेवारी रोजी पुण्यतिथीच्या मुख्य दिवशी पहाटे ५ वाजता संत झोलेबाबांची विधीवत महापूजा पार पडली. त्यानंतर सकाळी ७ ते १० या वेळेत संपूर्ण गावातून भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिला भजनी मंडळांनी सहभाग घेत ‘संत झोलेबाबा महाराज की जय’ या जयघोषात चिखली नगरी दुमदुमून गेली. टाळ-मृदंगाच्या निनादात ठिकठिकाणी पालखी रथाचे पूजन करण्यात आले.

सकाळी १० वाजता काल्याचे कीर्तन झाले असून दुपारी ४ वाजता भव्य महाप्रसाद वितरणाला सुरुवात झाली. या महाप्रसाद वितरणाचे विशेष आकर्षण म्हणजे जवळपास हजारो सेवेकऱ्यांनी सेवाभावाने सहभाग घेतला. सुमारे १०० ट्रॅक्टरच्या साहाय्याने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यामध्ये अंदाजे ८० ते ९० क्विंटल पुरी व भाजीचा महाप्रसाद तयार करून पंचक्रोशीतील हजारो भाविकांना वितरित करण्यात आला.

पुण्यतिथी निमित्त श्री संत झोलेबाबा मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. संपूर्ण मंदिर परिसरावर भव्य विद्युत रोषणाई करण्यात आल्याने रात्रीच्या वेळी मंदिराचा परिसर विशेष लक्षवेधी ठरत होता.

संत झोलेबाबा पुण्यतिथी महोत्सवाच्या माध्यमातून भक्ती, सेवा व सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!