कॉलेज शाळाबुलढाणामहाराष्ट्रयुवाशाळे कॉलेज

“श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ट कला महाविद्यालय पिंपळगाव बुद्रुक येथे स्नेहसंमेलन हर्षोल्लासात उद्घाटन

जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक या

“श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ट कला महाविद्यालय पिंपळगाव बुद्रुक येथे स्नेहसंमेलन हर्षोल्लासात उद्घाटन ” ,             प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा 

जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक या ठिकाणी दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचलीत श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ट कला महाविद्यालय पिंपळगाव बुद्रुक तालुका देऊळगावराजा येथे स्नेह संमेलनाचे उद्घाटन मोठया थाटात संपन्न झाले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय रामकृष्ण दादा शेटे होते तर उद्घाटक म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अरविंद भाऊ शिंगणे होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती देऊळगाव राजाचे गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले होते. सर्वप्रथम माता सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून मानवंदना दिली.त्यानंतर चित्रकला व हस्तकला प्रदर्शनीचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी मुसदवाले साहेब यांच्या हस्ते झाले.रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन अरविंद भाऊ शिंगणे यांच्या हस्ते झाले सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत गीत, विद्यार्थ्यांचे सामूहिक गीत, गणपती नृत्य,टाळकरी नृत्य व देशभक्तीपर नृत्य हे तीन सांस्कृतिक कार्यक्रम पाहुण्यांसाठी दाखवण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुरळीकर यांनी केले याप्रसंगी शाळेत सुरू असणाऱ्या विविध उपक्रम व परीक्षांची माहिती याप्रसंगी दिली प्रमुख मार्गदर्शक मुसदवाले यांनी विद्यार्थ्यांना अतिशय उद्बोधक मार्गदर्शन भावी जीवनाच्या दृष्टीने केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामकृष्ण दादा शेटे यांनी अध्यक्षीय भाषणात शाळेच्या प्रगती विषयी व विविध उपक्रमाविषयी समाधान व्यक्त करीत सर्वांचे अभिनंदन केले.उद्घाटन प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सहदेवराव सुरडकर, अशोक भाऊ कोटेचा तसेच स्थानिक सल्लागार समितीचे कारभारी नागरे, सौ.जनाबाई काकड, रामदास वाघ यांची उपस्थित होती कार्यक्रमाचे संचालन स्नेहसंमेलन प्रमुख इलगसरानीं केले तर आभार संदीप मुंडे सर यांनी मानले अतिशय आनंदी वातावरणात उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.त्यानंतर दुपारच्या सत्रात विविध क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले यात १०० मीटर धावणे, पोत्याची शर्यत, तीन पायाची शर्यत, एक मिनिट शर्यत व कबड्डीचे अंतिम सामने घेण्यात आले क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन स्थानिक सल्लागार कारभारी नागरे यांच्या हस्ते करण्यात आले अतिशय आनंदी वातावरणात सर्व कार्यक्रम संपन्न झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!