सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा येथे ४२८ वी जयंती उत्साहात साजरी
टाळ–मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक

सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा येथे ४२८ वी जयंती उत्साहात साजरी
टाळ–मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक
वाघाळा | प्रतिनिधी योगेश काकड शेतकरी न्यूज
सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा येथे थोर महापुरुषांची ४२८ वी जयंती अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त सकाळी ठीक १० वाजता टाळ–मृदुंगाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत गावातील भजनी मंडळांनी अभंग, भजनांच्या माध्यमातून वातावरण भक्तीमय केले होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या भजनी मंडळांनी टाळ–मृदुंगाच्या निनादाने संपूर्ण गाव दुमदुमून टाकले. यावेळी गावातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.
गावातून काढण्यात आलेली ही भव्य मिरवणूक मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत ग्रामदेवतेच्या स्थळी पोहोचली. मिरवणुकीदरम्यान ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून दर्शन घेतले.
या कार्यक्रमास गावाचे सरपंच विष्णू काकड, उपसरपंच सखाराम माळेकर, शिवसेना नेते गजानन वायाळ, पोलीस पाटील के.बी. राठोड, मृदंगाचार्य गणेश गवारे, अनिरुद्ध सानप, ज्ञानेश्वर माऊली वायाळ, राजेंद्र वायाळ, रेखा जाधव, लता गीते, साधना सानप, मनीषा माटे, लता वायाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच शेतकरी न्यूज नेटवर्कचे पत्रकार योगेश काकड यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली. या जयंती सोहळ्यासाठी महिला, पुरुष, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावकऱ्यांच्या एकजुटीचे व सामाजिक सलोख्याचे दर्शन या जयंती उत्सवातून घडले.




