अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त पिके – सेवलीत लोणीकर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर

अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त पिके – सेवलीत लोणीकर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर
सेवली (ता. जालना) │ दिनांक २० सप्टेंबर २०२५
जालना प्रतिनिधी सय्यद इलियास सादेक. मो. 8308302662
माजी मंत्री तथा आमदार श्री बबनराव लोणीकर साहेब यांनी आज जालना तालुक्यातील सेवली गावात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सेवली येथील शेतकरी श्री गणेश काळे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विक्रम उफाड, ज्ञानेश्वर शेजुळ, जिजाबाई जाधव, विकास पालवे, गजानन उफाड, डॉ. शरद पालवे यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच प्रशासनामधून उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, तहसीलदार छाया पवार, गटविकास अधिकारी संदीप पवार, तालुका कृषी अधिकारी विष्णू राठोड, समाधान वाघमारे, कोमल कुचेरिया, गणेश मोरे, गणेश जावळे, बाबुराव शिंदे, रमेश पवार, नारायण कोकाटे, कृष्णा तिवरे, नागराज भोरे, सौरभ माहुरकर, साहेबराव शिंदे, अजीम पटेल, प्रमोद भालेकर, आदिल पठाण, सतीश सदावर्ते, संजय काळे, राजू कांबळे, गणेश काळे, कैलास पवार, बंडू काळे, सुरेश पवार, नेमिनाथ मैराळ, फरहान अन्सारी, विष्णू मेहत्रे, उद्धव सांगळे, अनंतराव राऊत, रामा खरात, आसाराम खरात, सावता काळे, रामेश्वर जावळे, किशोर चव्हाण, रामदास ढाकणे, प्रभाकर गाढवे, प्रकाशराव इलग यांच्यासह
मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहाय्यक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान प्रत्यक्ष पाहून लवकरात लवकर शासनाकडून योग्य ती मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन श्री बबनराव लोणीकर साहेबांनी यावेळी दिले.




