Uncategorized

शेंदुर्जन मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर करा; लाभाची रक्कम तात्का द्या, अन्यथा १० ऑक्टोबरपासून आमरण उपोषण

शेतकऱ्यांचा संताप उफाळला!

शेंदुर्जन मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर करा; लाभाची रक्कम तात्का द्या, अन्यथा १० ऑक्टोबरपासून आमरण उपोषण

📍 सिंदखेडराजा :

सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले, तरीही शासनाने शेंदुर्जन मंडळाला दुष्काळग्रस्त घोषित केलेले नाही. त्यातच सायाळा गावातील तब्बल ४० शेतकरी राशन कार्डधारकांना शासनाच्या योजनेतील हक्काची रक्कम अजूनही मिळालेली नाही.

ही रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांचे संसार अक्षरशः अडचणीत आले आहेत.

घरासाठी आवश्यक धान्य व दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे.

मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे; फी भरणे थांबले आहे.

कर्जफेड थांबल्याने शेतकऱ्यांवर सावकार आणि बँकांचा दबाव वाढला आहे.

तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात आणि शेतकऱ्यांना हाकलवून लावतात, असा थेट आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांचा संताप यामुळे आणखी वाढला आहे.

“आमचे हक्काचे पैसे आम्हाला न देता शासन आमच्यावर अन्याय करत आहे. गांधींच्या मार्गाने आलो, पण वेळेत न्याय नाही मिळाला तर भगतसिंगांच्या मार्गाने येऊ!” असा इशारा शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिला.मुख्य मागण्या:

शेंदुर्जन मंडळ तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावे

शेतकरी राशन कार्डधारकांची थकीत रक्कम तात्काळ जमा करावी

अन्यथा १० ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!