गावात, शाळेत, घरात पाणीच पाणी… रूम्हना शेतकरी शंभर टक्के उद्ध्वस्त

गावात, शाळेत, घरात पाणीच पाणी… रूम्हना शेतकरी शंभर टक्के उद्ध्वस्त
ठिकाण : रूम्हना, तालुका सिंदखेडराजा, जि. बुलढाणा
दिनांक : १ सप्टेंबर २०२५, रात्री 
महापुरामुळे रूम्हना गावात प्रलयचं चित्र पाहायला मिळालं. गावात, शाळेत आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांपुढे आता “जगायचं कसं?” हा प्रश्न उभा ठाकला आहे.
👉 शेतकरी योगेश शेषराव जायभाये (गट नं. 73/69/52) यांची ६ एकर शेती पूर्णपणे वाहून गेली असून त्यांची एक विहीर कोसळली आहे.
👉 शेतकरी श्रीकृष्ण माणिकराव कायंदे (गट नं. 72) यांचे ५ एकर पिकांचे नुकसान झाले आहे.
👉 शेतकरी गजानन दिनकर जायभाये (गट नं. 75/76/77/96) यांची ४ एकर शेती बाधित झाली आहे.
कापूस, तूर आणि सोयाबीन पिके महापुराच्या पाण्यात वाहून गेल्याने लाखोंचं नुकसान झाले आहे. मात्र इतक्या मोठ्या संकटानंतरही शासनाकडून केवळ आश्वासनं मिळत आहेत, प्रत्यक्ष मदत नाही.
शेतकऱ्यांनी ताशेरे ओढले की, “सरकार आमच्या शेतीसाठी आणि जगण्यासाठी काही करत नाही, फोटोसेशन करून निघून जातं. आम्हाला आश्वासनं नकोत, तातडीची आर्थिक मदत हवी!”
रूम्हना शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.
ही माहिती शेतकरी योगेश जायभाये यांनी दिली आहे.




