जालना जिल्हा परिषदेसमोर आरोग्य अभियान कर्मचारी बेमुदत बंद आंदोलनावर सुरू

जालना जिल्हा परिषदेसमोर आरोग्य अभियान कर्मचारी बेमुदत बंद आंदोलनावर सुरू
शेतकरी न्यूज, जालना जिल्हा प्रतिनिधी – सय्यद इलियास सादेकमो. 8308302662
राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रिकरण समिती व एकता संघ यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी दि. 21 ऑगस्ट 2025 पासून जिल्हा परिषद कार्यालय, जालना येथे बेमुदत बंद आंदोलनास सुरुवात केली आहे.
या आंदोलनाला भारतीय मजदूर संघाने देखील ठाम पाठींबा दिला असून, आंदोलनाची उग्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकारी व कर्मचारी यांचे स्पष्ट म्हणणे आहे की,
“आमच्या प्रमुख मागण्या शासनाने वारंवार ऐकूनही फक्त आश्वासनेच दिली. मात्र ठोस निर्णय घेतला नाही. आता आम्ही आंदोलनाच्या मार्गावर उतरलो आहोत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.”
आंदोलनकर्त्यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे की, जर मागण्यांकडे तात्काळ लक्ष दिले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
👉 शासनाने आता तरी जागे होऊन आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून आंदोलनाचा तोडगा काढावा, हीच सर्वांची ठाम अपेक्षा आहे.



