वाघेझरी येथे ‘हळद रुसली लग्नाची’ नाटकाचे थाटात उद्घाटन

वाघेझरी येथे ‘हळद रुसली लग्नाची’ नाटकाचे थाटात उद्घाटन
जिल्हा.प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार एटापल्ली:
मौजा वाघेझरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हळद रुसली लग्नाची’ या सामाजिक-सांस्कृतिक नाटकाचे उद्घाटन काँग्रेस नेते श्री. प्रज्वल नागुलवार यांच्या हस्ते उत्साहात व थाटात पार पडले. या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील मान्यवर, लोकप्रतिनिधी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जारावंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधाकर भाऊ टेकाम, वाघेझरीचे सरपंच विलास कोंदामी, वेंनहार इलाका माजी अध्यक्ष सुधाकर भाऊ गोटा, गेदा ग्रामपंचायत सदस्य रमेश वैरागडे, माजी पंचायत समिती सभापती दुर्गुजी कोवासे, घोटसुर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच बेबीताई हेडो, कसंसूरच्या उपसरपंच छायाताई हिचामी, कसंसूरचे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य सुनीलजी मडावी, चित्तरंजन दास, संदीप वैरागडे, सुनीता वैरागडे, सुरेश मटामी, सैन्यू मटामी, सोमजी गावडे, शालिक शेंडे, वाघेझरीच्या उपसरपंच वनिता शेंडे यांच्यासह वाघेझरी परिसरातील आदिवासी विकास काँग्रेस (आविस काँग्रेस) चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना श्री. प्रज्वल नागुलवार यांनी ग्रामीण भागातील लोककला व नाट्यपरंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अशा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजप्रबोधनास चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले. उपस्थित मान्यवरांनी कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करत नाटकास शुभेच्छा दिल्या.



