छत्तीसगढ़टॉप न्यूज़दुनियादेशपंजाबमहाराष्ट्रयुवायूपीराज्यलोकल न्यूज़

वर्दडी.जिल्हा परिषद निवडणुकीत – शेतकरी पुत्र विलास विघ्ने : प्रामाणिकतेचं प्रतीक, जनतेच्या आशेचा किरण!

वर्दडी.जिल्हा परिषद निवडणुकीत – शेतकरी पुत्र विलास विघ्ने : प्रामाणिकतेचं प्रतीक, जनतेच्या आशेचा किरण!

सावखेड तेजन  (प्रतिनिधी)

सावखेड तेजन गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि लहानपणापासून शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करणारे विलास भाऊ विघ्ने यांच्याकडे पंचक्रोशीतील जनतेचा प्रचंड विश्वास आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने झटत राहून “जनतेचा कार्यकर्ता” ही ओळख निर्माण केली. सुख–दुःखाच्या प्रसंगी धावून येणारे, संकटात आधार देणारे आणि प्रामाणिकतेतून लोकांचा विश्वास जिंकणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची छाप उमटली आहे.

सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर साहेब यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते असून, आमदार साहेबांशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत. इतकेच नव्हे तर अनेकदा विश्वासाने ते म्हणायचे – “विलास, तूच खरा आमदार आहेस.” हा शब्दप्रामाण्य त्यांच्यावर असलेल्या आत्मीय विश्वासाचं प्रतीक आहे.

मागील जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज भरून स्वच्छ व प्रामाणिक नेतृत्वाची ताकद दाखवली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांचे नाव पुन्हा एकदा अग्रभागी असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे निष्ठावान सहकारी म्हणून विलास विघ्ने यांनी पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय भूमिका निभावली आहे. त्यामुळेच पक्षांतर्गत चर्चेत त्यांना “प्रामाणिकतेचा चेहरा” म्हणून उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

पंचक्रोशीतील नागरिकांची आज एकच मागणी आहे –

“जिल्हा परिषदेत आपला प्रतिनिधी हवा, आणि तो म्हणजे शेतकरी पुत्र विलास विघ्नेच हवेत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!