ग्रुप ग्रामपंचायत चिचोंडी बु. रायते येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
ग्रुप ग्रामपंचायत चिचोंडी बु. रायते येथे २६ जानेवारी रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि

ग्रुप ग्रामपंचायत चिचोंडी बु. रायते येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नाशिक | येवला | प्रतिनिधी : प्रविण पाटील
ग्रुप ग्रामपंचायत चिचोंडी बु. रायते येथे २६ जानेवारी रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित या राष्ट्रीय सोहळ्यास ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती. संपूर्ण परिसर राष्ट्रध्वजाने सजविण्यात आला असून देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रामपंचायत सदस्या भामाबाई सूर्यवंशी, द्रोपदा घोटेकर, मनीषा पाटील, मोनाली मढवई, रंजना मोरे, मीराबाई उबाळे व नेहा गोठी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सरपंच कल्पना चांगदेव शिंदे, उपसरपंच राणी गुंजाळ व पोलीस पाटील पुष्पा गुंजाळ यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपस्थितांनी “भारत माता की जय” व “वंदे मातरम्”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजारोहण गीत व महाराष्ट्र गीताचे सुमधुर गायन सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून दाद देण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांकडून कुष्ठरोग निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्यात आली, ज्यामुळे सामाजिक आरोग्याबाबत जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका स्नेहल मढवई, अनिता घोटेकर व मदतनीस गयाबाई पवार, शोभा मढवई, आशा वर्कर वनिता धिवर, सुवर्णा मढवई यांच्यासह ग्रामस्थ भागवत खराटे, विठ्ठल पवार, अर्जुन मढवई, साहेबराव मढवई, रवींद्र गुंजाळ, राजाराम घोटेकर, औदुंबर मढवई, संतोष भोरकडे तसेच ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील तरुण, युवक व ग्रामसभेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, संविधानिक मूल्ये व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आला.
—
नाशिक | येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील




