Uncategorized

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक – न्यायासाठी ९ ऑक्टोबर रोजी जलसमाधी आंदोलन!

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक – न्यायासाठी ९ ऑक्टोबर रोजी जलसमाधी आंदोलन!” 

गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर पावसाने अक्षरशः थैमान घातले.
अतिवृष्टी, ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे

शेतकऱ्यांची शेती उध्वस्त झाली,घरं कोसळली,जनावरं

मृत्युमुखी पडली

बीज उत्पादक शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त झाला🌾 लाखो रुपयांचं नुकसान डोळ्यांसमोर असूनही शासनाने केवळ ५०% मदतीवर तुटपुंजा निर्णय घेतला.

📍 जनतेच्या डोळ्यांत धूळफेक

जिल्ह्याचे पालकमंत्री, सहपालकमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, खासदार आणि आमदार मोठ्या ताफ्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर फिरले, फोटोसेशन केले, गोड बोलणं आणि आश्वासनांची बरसात केली.
पण खरी मदत मात्र शेतकऱ्याच्या हातात आली का❓
हा शेतकऱ्याच्या रक्ताचा, घामाचा आणि स्वप्नांचा अपमान नाही का❓

⚡ शेतकरी योद्धा कृती समिती सरकारला प्रश्न विचारते –

बुलढाण्यातील आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या जखमा सरकारला दिसल्या नाहीत का?

शेतातील उध्वस्त पिकं, कोसळलेले बांध, वाहून गेलेली जनावरं – हे सर्व मृत्यूमुखी पडले तरी शासन गप्प का?

शेतकऱ्यांच्या आवाजाला न्याय का नाही?

शेतकऱ्यांना फक्त ५०% मदत देणं म्हणजे क्रूर थट्टा नाही का?

🚩 आता शेतकरी गप्प बसणार नाही!

👉 आयुष्य उद्ध्वस्त झालंय
👉 कर्जाच्या जाळ्यात अडकलोय
👉 शासन केवळ तोंडाची वचने देतंय

➡️ म्हणूनच आता निर्णायक लढ्याची वेळ आली आहे.

📢 जलसमाधी आंदोलनाची हाक

📅 दिनांक : ९ ऑक्टोबर २०२५
📍 ठिकाण : पळसखेड चक्का, पातळगंगा नदी

➡️ हे आंदोलन केवळ मदतीसाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आहे.
➡️ हे आंदोलन आपल्या जगण्याच्या हक्कासाठी आहे.
➡️ हे आंदोलन आपल्या भविष्यासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी आहे.

सर्व शेतकऱ्यांना आवाहन

👉 पक्षीय झेंडे बाजूला ठेवा
👉 एकत्र या – शेतकऱ्यांच्या हक्कासाठी!
👉 आपल्या न्यायासाठी, आपल्या भविष्यासाठी!

“शेतकऱ्यांच्या आक्रोशाला आता थांबवता येणार नाही!”
– शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!