सर्व आमदार-खासदारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वर्षाचे वेतन द्यावे; अन्यथा तीव्र आंदोलन – बालाजी सोसे

- शेतकरी अडचणीत – सरकार झोपेत!
सर्व आमदार-खासदारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वर्षाचे वेतन द्यावे; अन्यथा तीव्र आंदोलन – बालाजी सोसे
बुलढाणा जिल्हा – सिंदखेड राजा :
गेल्या तीन वर्षांपासून सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी निसर्गाच्या तडाख्याला तोंड देत सतत संकटाच्या गर्तेत ढकलला जात आहे. पिके उध्वस्त होत आहेत, शेतकरी कर्जबाजारी होत आहे; पण सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांसाठी मदतीचा एक थेंबही पडत नाही. आश्वासनांची बरसात मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
या भीषण परिस्थितीत शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. बालाजी सोसे यांनी सरकारला धारेवर धरत जोरदार मागणी केली आहे की –
👉 संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व आमदार, सर्व खासदार (सरकारी पक्ष आणि विरोधक) महाराष्ट्रातील पुरग्रस्त व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक वर्षाचे संपूर्ण वेतन मदत म्हणून द्यावे.
मुद्देसंगत इशारे :
1. मुख्यमंत्री म्हणतात: आमच्या सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे.
2. शेतकरी विचारतो: जर हे खरे असेल तर सर्व आमदार-खासदारांनी तातडीने मदत दिली पाहिजे.
3. सर्व पक्षांचे इशारे: विरोधक सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीमागे असल्याचा दावा करतात; आता ही कृतीची वेळ आहे.
4. निष्कर्ष: सर्व पक्षांचे सर्व आमदार-खासदार खंबीरपणे उभे राहिले तरच शेतकऱ्याला न्याय मिळेल.
शेतकऱ्यांच्या तातडीच्या मागण्या :
संपूर्ण कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी :
जिराईत शेती – ₹५०,००० प्रति हेक्टर
बागायती शेती – ₹७०,००० प्रति हेक्टर
बहुशेती पिके – ₹१ लाख प्रति हेक्टर
पिकविमा १००% तातडीने द्यावी.
विमा कंपन्या निकष लावून खेळ करणार असतील, तर महसूल अहवालावर थेट सरकारने मदत द्यावी.
महसूल पंचनामे न करता संपूर्ण सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा.
शेतकऱ्यांचा कडक इशारा :
“शेतकरी शांत आहे म्हणजे तो कमजोर नाही! शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर लवकरच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारले जाईल. त्याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकार आणि निवडून दिलेल्या आमदार-खासदारांवर राहील,” असा इशारा शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. बालाजी सोसे यांनी दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील आमदार-खासदार जर खंबीरपणे उभे राहिले, तरच
शेतकऱ्यांना न्याय मिळेल – अन्यथा शेतकऱ्यांचा संताप अनावर होईल!
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व आजी आणि माजी सर्व खासदार आमदारांनी एक वर्षाचा वेतन दिलं पाहिजेत कोण शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे हे यातून सिद्ध होईल




