टॉप न्यूज़दिल्ली NCRदेशमहाराष्ट्रराज्य

सावखेड भोई येथे शेतकऱ्यांचे आमरण उपोषण — रस्ता खुला करण्यासाठी ठाम लढा

सावखेड भोई येथे शेतकऱ्यांचे आमरण उपोषण — रस्ता खुला करण्यासाठी ठाम लढा

दिनांक: 28 ऑक्टोबर 2025
स्थळ: देऊळगांव राजा, जिल्हा बुलढाणा

मौजे सावखेड भोई लघु पाटबंधारे तलावातील डाव्या कालव्यावरील हेड ते बायपास रस्ता खुला करण्याची मागणी करत गावातील शेतकरी आणि नागरिकांनी आज दिनांक 28 ऑक्टोबरपासून मृद व जलसंधारण उपविभागीय कार्यालय, देऊळगांव राजा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यांनी यापूर्वी अनेक वेळा लेखी अर्ज आणि निवेदने दिली असून, दि. 02 जून 2025 रोजी विभागाकडून रस्ता खुला करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्या आश्वासनाला आज पाच महिन्यांहून अधिक काळ उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

उपोषणकर्त्या महिला ताईंनी शारदा पंढरीनाथ म्हस्के यांनी ठाम भूमिका घेत सांगितले — “जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. काही जरी झालं तरी चालेल, पण माघार नाही. ही लढाई आमच्या हक्कासाठीची आणि शेवटची आहे.

या उपोषणात प्रमुख नागरिक आणि शेतकऱ्यांचा सहभाग असून, यासंदर्भातील निवेदनाची प्रत पुढील अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे —
मा. आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच स्थानिक पोलीस ठाणे.

स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी प्रशासनाने तातडीने कालव्यावरील रस्ता खुला करून शेतमाल वाहतुकीसाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षित शिक्षणासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.

या उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी सोसे तसेच“शेख झुलफेकार  भैय्या देऊळगाव मही शेतकरी क्रांतिकारी संघटना” हे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!