सावरगाव बर्डे येथे चोरी गेलेले डेटोनेटर हस्तगत – तब्बल 1,69,488 रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

सावरगाव बर्डे येथे चोरी गेलेले डेटोनेटर हस्तगत – तब्बल 1,69,488 रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
वाशिम जिल्हा प्रतिनिधी – विश्वास कुटे
वाशिम ग्रामीण पोलीस हद्दीत सप्टेंबर 2025 मध्ये घडलेल्या डेटोनेटर चोरी प्रकरणाचा अखेर भंडाफोड झाला असून या प्रकरणातील संशयितांकडून एकूण 4076 डेटोनेटर जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरी गेलेल्या मुद्देमालाची किंमत ₹1,69,488/- इतकी असून या गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
फिर्यादी बलराम राजु चौधरी यांचा सावरगाव बर्डे येथील परवानाधारक मॅगझीनमधून विहीर बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या डेटोनेटरची चोरी 19 सप्टेंबर रोजी झाली होती. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अप क्र 285/25 अन्वये कलम 305(अ), 334 भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. डेटोनेटरचा वापर देशविघातक कारवायांसाठी होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून विशेष लक्ष देत तपास गतीमान केला होता.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव बर्डे परिसरात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. यादरम्यान, सुनिल सुरेश कंकाळ याच्या शेतामध्ये सोयाबीन कुटाराच्या गंजीत लपवून ठेवलेले सात नायलॉनच्या पिशव्यांतून सर्व 4076 डेटोनेटर आढळून आले. पंचनाम्यानंतर मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
या गुन्ह्यातील चार आरोपी —
1. सुनिल सुरेश कंकाळ
2. अमोल पांडुरंग बर्डे
3. दशरथ पांडुरंग बर्डे
4. गोविंदा उर्फ राजेश सोपान कड
(सर्व रा. सावरगाव बर्डे) — यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात आणखी जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदिप अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोनि प्रदीप परदेशी, सपोनि योगेश धोत्रे, पोहवा गजानन झगरे, पोलीस कर्मचारी प्रविन शिरसाट, ज्ञानेश्वर मात्रे, अमोल इरतकर, संदिप दुतोंडे, संतोष वाघ, स्पनिल तुळजापुरे, सुनिल तायडे यांचा सहभाग होता.
चोरीतील पुरावे पूर्तता करण्याचे काम सध्या सुरू असून आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांचा तपास अधिक वेगाने सुरु आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोउ
पनि राहुल गंधे हे करत आहेत.



