Uncategorized

सरकारचा दुजाभाव! लोणार-मेहेकर तालुके अतिवृष्टी उपाययोजनेतून वगळले — शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पुन्हा पुसली पाने!” 

सरकारचा दुजाभाव! लोणार-मेहेकर तालुके अतिवृष्टी उपाययोजनेतून वगळले — शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पुन्हा पुसली पाने!”

लोणार तालुका शेतकरी न्यूज प्रतिनिधी : ज्ञानेश्वर महादु मोरे

राज्य सरकारने नुकताच 31,628 कोटी रुपयांचा अतिवृष्टी उपाययोजना निधी जाहीर केला. परंतु या निधीतून बुलढाणा जिल्ह्यातील लोणार व मेहेकर तालुके वगळून सरकारने पुन्हा एकदा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत!

शेतकऱ्यांचे सर्वस्व पावसाने वाहून गेलं, शेतमाल सडला, जमीन नापीक झाली — पण सरकारला हे सर्व दिसलं नाही!

अतिवृष्टीचा कहर – पण प्रशासन झोपलेले!

जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये लोणार आणि मेहेकर तालुक्यांमध्ये अनेक वेळा अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि ढगफुटी सदृश्य पाऊस पडला.

नदीकाठच्या शेतजमिनींतील काळी कसदार माती पुराच्या पाण्याने वाहून गेली, परिणामी त्या जमिनी कायमस्वरूपी नापीक झाल्या.

सोयाबीन, हळद, तूर, मुग, उडीद, भुईमूग, कपाशी — सर्वच पिके उभी सडली, चिभडली. हजारो शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले.

तरीही, या सर्व नुकसानीकडे सरकार आणि प्रशासनाचे डोळे झाकलेले आहेत.

सरकारचा दुजाभाव — शेतकऱ्यांशी अन्याय!

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुके समाविष्ट आहेत, परंतु लोणार व मेहेकर यांना वगळण्यात आले.

हा निर्णय केवळ अन्यायकारक नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला प्रशासनिक अत्याचार आहे.

“जेव्हा सर्वाधिक नुकसान झाले ते तालुके वगळले, आणि जिथे कमी नुकसान झाले ते तालुके समाविष्ट झाले — हा नेमका कोणता निकष?”

हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात धगधगत आहे.

शेतकऱ्यांचा इशारा – आता आंदोलनाची वेळ आली आहे!

जर सरकारने त्वरित लोणार आणि मेहेकर तालुके अतिवृष्टी उपाययोजनेत समाविष्ट केले नाहीत, तर या तालुक्यातील शेतकरी संपूर्णपणे निवडणुकांचा बहिष्कार करतील.

कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी

यांना गावात प्रवेशबंदी केली जाईल.

शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच राहील.

शेवटचा प्रश्न – शेतकऱ्याचे आयुष्य इतके स्वस्त आहे का?

दरवेळी पाऊस येतो, नुकसान होते, शेतकरी हात जोडतो, आणि सरकारच्या दारात तडजोड मागतो.

पण यावेळी शेतकरी केवळ मदतीची मागणी करत नाही —

तो न्यायाची मागणी करत आहे!

आमचा ठाम इशारा :

जर त्वरित कार्यवाही झाली नाही, तर लोणार-मेहेकर तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील, शासनाला जागं करणार!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!