सावखेड फाटा – सिंदखेड राजा मार्गावर भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर!
सावखेड फाटा – सिंदखेड राजा मार्गावर भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर!
पोलीस स्टेशन फक्त 5 किमी… तरीही पोलीस तब्बल 1 तास उशिरा!
आज दि. 24 नोव्हेंबर, सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सावखेड फाटा – सिंदखेड राजा लाभाने देव येथे मोटरसायकल–इंडिको कारची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यात तुकाराम अश्रुजी गवई (रा. जवळखेड) यांचा जागीच मृत्यू, तर जखमी व्यक्ती विनोद गवई आहेत.
अपघातात सहभागी वाहनं :
मोटरसायकल क्रमांक MH 28 AE 35 प्रवासी
इंडिको कार क्रमांक MH 47 K 2219 ही गाडी अखेर पोलिसांच्या ताब्यात
घटनास्थळ पोलीस स्टेशनपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर असतानाही, पोलीस तब्बल एक तास उशिरा पोहोचल्याचे स्थानिकांनी गंभीर आरोप केले.
घटना वेळी पोलीस मोबाईलमध्ये गुंग असल्यामुळे मृत व्यक्तीला उचलण्यासाठी पुढे सरसावले नाहीत.
अंबुलन्सच्या अभावामुळे तुकाराम अश्रुजी गवई तब्बल एक तास उन्हात रोडवर पडून राहिला, यामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रवाशांचा रोष अधिक तीव्र झाला.
या अपघातामुळे मोठी गर्दी जमली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली.
स्थानिकांचा संताप —
“वेळेवर फोन करूनही पोलीस येत नाहीत, मोबाईलमध्ये गुंग राहतात, आणि अंबुलन्सही उपलब्ध नाही… हा सुस्तपणा जीवघेणा ठरतो!”


