शेतकऱ्यांचा आवाज… जनतेचा विश्वास — नंदकिशोर घुगे! 🔥

🔥 शेतकऱ्यांचा आवाज… जनतेचा विश्वास — नंदकिशोर घुगे! 🔥
आज जळगाव परिसरात नंदकिशोर घुगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शेतकरी, तरुण, कार्यकर्ते आणि महिला मंडळींचा जनसागर या कार्यक्रमात उपस्थित होता. 🌾💪
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नेहमी रस्त्यावर उतरणारा, प्रत्येक आंदोलनात आघाडीवर असलेला,
शेतकरी योद्धा कृती समितीचा संस्थापक सदस्य नंदकिशोर घुगे आता किनगाव राजा पंचायत समितीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज! ⚡
“पक्षाने तिकीट दिलं तर 100% लढणार, नाही दिलं तरी पक्षासोबत ठामपणे उभा राहणार!”
अशी पक्षनिष्ठा, जिद्द आणि प्रामाणिकपणा दाखवणारा नेता म्हणजे 🔥 नंदकिशोर घुगे! 🔥
शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी असंख्य कामे केली आहेत.
शेतकऱ्यांच्या विद्युत लाईनचे प्रश्न असोत, डीपी जळालेली असो किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अडचणीत आलेला शेतकरी असो —
घुगे नेहमीच तत्परतेने मदतीला धाव घेतात. ⚡🌾
विशेष म्हणजे, घुगे यांच्या पुढाकाराने गावात सोलर पॅनल आणि सोलर पंप योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला.
त्यांनी स्वतः गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना योजना समजावून सांगितल्या,
परिणामी अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा शंभर टक्के लाभ घेतला. ☀️💧
अशा अनेक योजना आणि उपक्रम नंदकिशोर घुगे यांच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पार पडले. 🙌
कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे
तसेच शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी सोसे प्रमुख उपस्थित होते.
गावातील माजी पंचायत समिती सदस्य, आजी-माजी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,
पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🙏
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील श्री दिगंबर डिगोळे, श्री हरदास वाघ व श्री रामदास वाघ माजी पंचायत समिती सदस्य यांनी केले.
श्री रामदास वाघ यांनी सांगितले — “जर मला तिकीट दिलं तर मी 100% लढणार, आणि नंदूला तिकीट दिलं तर त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार!”
तसेच श्री हरिदास भाऊ वाघ यांनीही सांगितले की, “जर दोघांपैकी एकाला जर टिकीट मिळाले तर त्याच्या पाठीमागे गाव 100% उभे राहणार जर दोघांना पण तिकीट मिळालं नाही आणि जिल्हा परिषदच डॉक्टर साहेबांना तिकीट मिळालं तर गाव ज्याच्या मागे शंभर टक्के उभे राहील अशी ग्वाही दिली
दोघांनीही स्पष्ट ग्वाही दिली की — “आम्हाला तिकीट मिळाले नाही तरी आम्ही पक्षासोबतच काम करणार आहोत,आणि डॉ. सुनील कायंदे यांच्या पाठीमागे ठाम देशी उभे राहू!”
जनतेच्या मनातील नाव — शेतकऱ्यांचा खरा नेता! 🌾नंदकिशोर घुगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉



