पुन्हा एकदा शेतकऱ्यांना फसवणूक — राज्य सरकारची रब्बी मदत योजना हवेतच विरली!
पुन्हा एकदा शेतकऱ्यांना फसवणूक — राज्य सरकारची रब्बी मदत योजना हवेतच विरली!
शेतकरी न्यूज
राज्य सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रती हेक्टर दहा हजार रुपयांची मदत जाहीर करून मोठा गाजावाजा केला. पण ती घोषणा केवळ आश्वासनापुरतीच ठरली आहे.
दिनांक ३० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयामध्ये (जीआर) बुलढाणा जिल्ह्याचा कुठेच उल्लेख नाही!
मग प्रश्न असा निर्माण होतो की —
👉 ही मदत नेमकी कुणासाठी जाहीर केली?
👉 आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय गुन्हा आहे?
सरकारच्या या निर्णयानंतर प्रशासन मात्र स्वतःची पाठ थोपटतं, आणि सांगतं — “आम्ही एवढी मदत दिली, तेवढी मदत दिली.”
पण प्रत्यक्षात बुलढाणा जिल्हा वंचितच!
आता शेतकरी विचारतो —
> “आमच्या जिल्ह्याला काय कावळा ठरवलं आहे का?”
शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आणि संभ्रम निर्माण झाला आहे. हे पहिल्यांदाच नाही; याआधीही राज्य सरकारकडून अनेक वेळा अशाच फसव्या घोषणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आहे.
आता तर कर्जमाफीही शब्दांचा खेळ ठरत आहे. प्रत्येकवेळी सरकार गोड घोषणांचा फुगा फुगवतं, पण शेवटी शेतकऱ्याच्या हातात रिकामेपणाचं दु:ख उरतं.
या सर्व प्रकरणात आपल्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणताही ठोस आवाज उठवला गेला नाही.
त्यामुळे शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा, राज्य सरकार व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध करते!
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहील —
“आता नाही तर कधीच नाही!”




