आसेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील सनगाव धरणात बुडालेल्या मामा व भाच्यांचे मृतदेह संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने शोधुन बाहेर काढलेत*श

- आसेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील सनगाव धरणात बुडालेल्या मामा व भाच्यांचे मृतदेह संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने शोधुन बाहेर काढलेत

वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक,पिंजर जि.अकोला या टिमचे साहसी कार्य
आसेगाव पोलीसांना नातेवाईकांकडून मीळालेल्या माहितीनुसार दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सनगाव ता.मंगरूळपीर जि.वाशिम येथील रहीवासी सिद्धार्थ मोहन बनसोड वय अं.(35) वर्ष,(मामा) आणी भाचे अंकुश राजेंद्र भालेराव अं.वय (16) वर्ष,व कार्तिक राजेंद्र भालेराव अं.वय (14) वर्ष, हे तीन ही मामाभाचे यांचे सनगाव शिवारातील धरणाच्या काठावर तिघांचेही कपडे आढळून आल्याने हे धरणात बुडाल्याची दाट शक्यता होती. स्थानिकांनी शोध घेतला असता काहीच मिळुन आले नाही शेवटी आज सकाळी आसेगाव पोलीस ठाण्याचे पिआय रामकृष्ण भाकडे सर यांनी 26 डिसेंबर रोजी सकाळीच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवन-रक्षक दिपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ पाचारण केले तेव्हा लगेच जिवन-रक्षक दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयुर सळेदार,शेखर केवट,अतुल उमाळे,अश्विन केवट,विष्णु केवट,हर्षल वानखडे,विद्याधर वाघमारे,योगेश आगळे, यांचेसह रेस्कु बोट आणी शोध व बचाव साहीत्यासह आज दुपारी घटनास्थळी पोहचले आणी लोकेशन ट्रेस करुन सर्च ऑपरेशन चालु केले असता दुपारी 1:10 वाजता 15 फुट खोल पाण्यातुन एका तासातच धरणातील तीनही मृतदेह शोधून बाहेर काढून पोलीसांचे ताब्यात दिले.या संपुर्ण घटनेवर वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर सर,निवासी उप-जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे सर, यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास सुरु आहे



