टॉप न्यूज़बुलढाणामहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़शेतीशेती न्यूज

गुरे चारताना बिबट्याचे दर्शन; शेतकरी हादरला – परिसरात भीतीचे सावट

गुरे चारताना बिबट्याचे दर्शन; शेतकरी हादरला – परिसरात भीतीचे सावट

पत्रकार, गजानन कहाळे

सिंदखेड राजा तालुका : आडगाव राजा शिवारात गुरे चारत असलेल्या शेतकरी भिकाजी शिपणे यांना सायंकाळी अचानक बिबट्या दिसल्याने त्यांनी अतिशय घाबरून गावात धाव घेतली व नागरिकांना माहिती दिली. यानंतर गजानन कहाळे यांनी देऊळगाव राजा वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड यांना कळवले.

वनविभागाचे पथक—सिंदखेड राजा वर्तुळ वनपाल देशमुख, पळसखेड चक्का बिटच्या वनरक्षक रुपम वाडेकर तसेच वनमजूर श्रीराम केकान—तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. बिबट्या दिसून न आल्याने पथकाने शेतकऱ्यांना सावधगिरीचे आणि सुरक्षाविषयक मार्गदर्शन केले.

लगतच्या अनेक गावांत बिबट्याचे सातत्यपूर्ण दर्शन

गेल्या काही दिवसांत या संपूर्ण पट्ट्यात बिबट्याची हालचाल मोठ्या प्रमाणात नोंदली जात असून
पळसखेड चक्का – सावखेड तेजन – उंबरद नरसिंह – पुन्हा सावखेड तेजन – आडगाव राजा – हनुदखेड – पुन्हा उंबरद नरसिंह
या गावांमध्ये त्याचे दर्शन झाले आहे. अद्याप प्रत्यक्ष हल्ला झालेला नसला तरी सततच्या दर्शनामुळे भीतीचे वातावरण दिवसेंदिवस वाढत आहे.

शेतकऱ्यांचा दुहेरी त्रास – वन्यप्राणी रोही व बिबट्या दोन्हींचा धोका

या परिसरातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येऊन ठेपले आहे.
पहिले म्हणजे रोहीसारख्या वन्यप्राण्यांमुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकऱ्यांना रात्री पहारा द्यावा लागत आहे.
आणि दुसरे म्हणजे बिबट्या गावोगावी फिरत असल्याची भीती, त्यामुळे एकट्याने शेतात जाणे धोकादायक झाले आहे.

शेतात पहारा न केल्यास रोही संपूर्ण रब्बी पीक उद्ध्वस्त करते, आणि पहारा करताना बिबट्याचा धोका — अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे शेतकरी आता प्रश्न विचारू लागले आहेत की, “शेतात राखण करावी तरी कशी? आणि शेती करावी कशी?”

स्थानिक शेतकरी वनविभागालाच यासाठी जबाबदार ठरवत आहेत, कारण ना बिबट्यावर नियंत्रण, ना रोहीपासून संरक्षण — दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांना त्रास होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

वनविभागाकडून दिलेल्या सूचना

शेतात गटाने जाणे, टॉर्चचा वापर, काठ्यांना घुंगरू बांधणे, संशयास्पद हालचाल दिसताच त्वरित वनविभागाला कळवणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत; परंतु प्रत्यक्षात बिबट्या पकडण्यात विभागाला यश मिळालेले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!