महाराष्ट्रवाढदिवस

शब्द नाही, कृती बोलते… शिक्षणासाठी उघडलेला पाबळे कुटुंबाचा मायेचा हात

भागवत एकादशीच्या पवित्र दिवशी येवला तालुक्यात सामाजिक जाणीवेचा दीप प्रज्वलित

शब्द नाही, कृती बोलते… शिक्षणासाठी उघडलेला पाबळे कुटुंबाचा मायेचा हात!”

भागवत एकादशीच्या पवित्र दिवशी येवला तालुक्यात सामाजिक जाणीवेचा दीप प्रज्वलित

       नाशिक | येवला | प्रतिनिधी – प्रविण पाटील

आज राजकारणात फक्त घोषणा ऐकू येतात, पण काही कुटुंबे अशी असतात जी न बोलता समाजासाठी काम करतात. येवला तालुक्यातील रायते, निमगाव मढ, पारेगाव, चिचोंडी खुर्द व हनुमानवाडी बदापूर या गावांमध्ये रामदास पाबळे (आण्णा) व पाबळे परिवाराने असेच एक समाजाला दिशा देणारे कार्य करून दाखवले.

भागवत एकादशीच्या पावन पर्वावर, रामदास आण्णा यांच्या नातवाच्या चि. श्रेयस प्रकाश पाबळे याच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना वह्या, पेन, पेन्सिल, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम कोणत्याही गाजावाजाविना, पण मनापासून आणि समाजाच्या मुळाशी जाऊन करण्यात आला.
विशेष म्हणजे, निमगाव मढ परिसरात जिल्हा परिषद शाळेसाठी असा उपक्रम प्रथमच झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना दिसून आली. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी पाबळे कुटुंबाच्या या उपक्रमाचे उघडपणे कौतुक केले.
यावेळी रामदास आण्णा पाबळे म्हणाले,
“समाजाने आम्हाला खूप दिलं आहे. आता देण्याची वेळ आहे. जिल्हा परिषद शाळांचा पट वाढावा, गोरगरीब मुलांना शिकण्यासाठी बळ मिळावं, याच उद्देशाने हे काम करत आहोत. आजची ही मुलं उद्या IPS, PSI, डॉक्टर, वकील, अधिकारी, सैनिक, शेतकरी बनून आपल्या गावाचं, तालुक्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्वल करतील, हीच आमची अपेक्षा आहे.”
मुख्याध्यापक देवरे सर, पाटील सर यांनी या उपक्रमाचे स्वागत करून श्रेयस पाबळे यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन माने सर यांनी केले.
जाधव मॅडम, खराडे मॅडम, झुंजारे सर, महाजन मॅडम, कुऱ्हाडे मॅडम, खळे मॅडम, बचाव-बच्छाव सर, दुकळे मॅडम, भामरे मॅडम, थोरात मॅडम, गोरडे मॅडम, खैरनार मॅडम, मारवाडी मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
SMC अध्यक्ष सुदाम लभडे यांनी आभार मानले.
किरण लभडे, संतोष लभडे, रंगनाथ लभडे यांच्यासह रायते, पारेगाव, चिचोंडी खुर्द, बदापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 निवडणूक जिंकण्यासाठी शब्द लागत नाहीत, विश्वास लागतो… आणि तो विश्वास अशाच कामातून तयार होतो.
पाबळे कुटुंबाचा हा उपक्रम म्हणजे उद्याच्या नेतृत्वाची नांदी असल्याची भावना नागरिकांमध्ये उमटताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!