क्राइमपोलीसभ्रष्टाचारमहाराष्ट्र

अंजनगाव तालुक्यातील मुऱ्हा देवीच्या चरणी पवन विखेंनी अर्पण केला मातेला नवीन ‘टोप’

दुर्दैवी घटनेनंतर तेल्हारा भक्तांचा आदर्श

अंजनगाव तालुक्यातील मुऱ्हा देवीच्या चरणी पवन विखेंनी अर्पण केला मातेला नवीन ‘टोप’

दुर्दैवी घटनेनंतर तेल्हारा भक्तांचा आदर्श

   तेल्हारा तालुका प्रतिनिधी : राजेश पाटील खारोडे

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा येथे असलेल्या जागृत देवस्थान श्री मुऱ्हा देवीच्या मंदिरात काल घडलेल्या चोरीच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. अज्ञात दोन नराधमांनी मंदिरात घुसून देवीच्या मूर्तीवरील चांदीचा टोप तसेच इतर मौल्यवान साहित्य चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत होती.

मुऱ्हा देवी हे अंजनगाव तालुक्यातील अत्यंत श्रद्धास्थान असून, दरवर्षी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिरातील चोरीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या. अनेकांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेची माहिती तेल्हारा येथील सामाजिक कार्यकर्ते व कट्टर देवीभक्त श्री. पवन विखे यांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आदर्श निर्णय घेतला. आज त्यांनी स्वतः मुऱ्हा देवीच्या मंदिरात येऊन मातेच्या चरणी नवीन टोप अर्पण केला. त्यांच्या या कृतीमुळे केवळ देवीची शोभा पुन्हा बहाल झाली नाही, तर भाविकांच्या मनातील वेदनांवरही फुंकर बसली.

“देवी ही आमची श्रद्धा आहे. तिच्या चरणी काही अर्पण करणे हे माझे कर्तव्यच आहे,” अशी भावना व्यक्त करत पवन विखे यांनी भक्ती, उदारता आणि सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवले. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, तेल्हारा तालुक्यातील भक्तांचा हा आदर्श भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, मंदिरातील चोरीप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, लवकरच दोषींना अटक करण्यात येईल, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे. मात्र या घटनेनंतर पवन विखे यांच्या पुढाकारामुळे श्रद्धा, एकोपा आणि भक्तीचे दर्शन घडल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!