कै.आसराबाई कौतिक मढवई मरावे परी कीर्ती रुपी उरावे मयत आसराबाई यांचे राखीत लावले वडाचे झाड
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी या उक्ती प्रमाणे गं. भा. कै. आसराबाई कौतिक

कै.आसराबाई कौतिक मढवई मरावे परी कीर्ती रुपी उरावे मयत आसराबाई यांचे राखीत लावले वडाचे झाड
नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी या उक्ती प्रमाणे गं. भा. कै. आसराबाई कौतिक मढवई यांना दिनांक ०२/०१/२०२६ रोजी देवाज्ञा झाली त्यांची आज रक्षा राख सावडणे च्या दिवशी त्यांचे कुटूंबीय
यांनी मयत मातोश्री आजी आसराबाई कौतिक मढवई यांची राख गंगेत विसर्जन न करता ग्रामपंचायत चिचोंडी बुद्रुक येथील स्मशान भूमी आवारातील जागेत त्यांची आठवण निरंतर असावी व त्या आपल्या नजरेत अमर असाव्यात या दृष्टीकोनातून त्यांचे कुटूंबातील शोकाकुल परिवारातील मुलगा साहेबराव कौतिक मढवई नातु राजेंद्र मढवई सुभाष मढवई नितीन मढवई बबन मढवई गणेश मढवई यांनी वडाचे झाड लावत अनोखा उपक्रम राबविला आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सभोवताली चर्चा होत आहे. कौतुक केल्या जात आहे यावेळी मयत आसराबाई यांची मुलगी परिगाबाई मोरे सुन चंद्रकला, निर्मला, मीना मढवई नात वंदना म्हस्के, जयश्री गोरे, सोनाली विघ्ने, नातसुन अनुराधा,
कल्पना मढवई, जयश्री मढवई,
प्रियंका गागरे,गयाबाई गाडे
संगीता मढवई, ज्योती मढवई या सर्वांनी कै. आसाराबाई कौतिक मढवई यांच्या आठवणीचे वडाचे झाड लावत निसर्गाशी व मयत व्यक्तीला देवाकडे योग्य स्थान मिळावा यासाठी पसायदान घेत राखीच्या कार्यक्रम पूर्ण झाल्याचे कळविले.
पुतणे गावातील ज्येष्ठ राजकीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य नातेवाईक आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील




