येवला सरकारी रुग्णालयात देवस्थान जगदंबा देवी ट्रस्टच्या वतीने रॅबीज इंजेक्शन ची भेट
येवला तालुका येथील कोटमगाव येथील देवस्थान जगदंबा ट्रस्टच्या वतीने येवला सरकारी रुग्णालयला रॅबिज इंजेक्शन उपलब्ध करून दिले

येवला सरकारी रुग्णालयात देवस्थान जगदंबा देवी ट्रस्टच्या वतीने रॅबीज इंजेक्शन ची भेट
नाशिक येवला प्रतिनिधी प्रवीण पाटील
येवला तालुका येथील कोटमगाव येथील देवस्थान जगदंबा ट्रस्टच्या वतीने येवला सरकारी रुग्णालयला रॅबिज इंजेक्शन उपलब्ध करून दिले त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष विश्वस्त मंडळ उपस्थित होते संस्थेचे विश्वस्त गणेश भाऊ कोटमे सचिव अंबादास भोसले खजिनदार दिलीप कोटमे विश्वस्त अंबादास लहरे कोटमगाव चे सरपंच अर्जुन भाऊ कोटमे हे देण्याचे कारण असे की तालुक्यातील अनेक लोकांना महिलांना पुरुषांना कुत्रे चावल्यानंतर प्रथमोउपचार साठी येवला येथील सरकारी रुग्णालय येथे गेले असता ते रॅबिज चे इंजेक्शन नसल्याचे कारण सांगतात. कुत्रे चावलेल्या पेशंट यास जाणीवपूर्वक त्रास दिल्यासारखे वाटत असते. या हेतूने त्रासलेला पेशंट वैतागलेला अवस्थेत स्वतःची जीव वाचवण्याची काळजी करत असतो. ही वार्ता देवस्थान कोटमगाव येथील जगदंबा ट्रस्ट विश्वस्त यांना कळताच सामाजिक सेवा घडावी पेशन्ट व अधिकारी यांच्यात संभ्रम निर्माण होऊ नयेत यासाठी सर्व विश्वस्त यांनी देवस्थान जगदंबा मातेच्या वतीने येवला रुग्णालयास १०० नग असलेले रॅबीज इंजेक्शन चा बॉक्स भेट म्हणून दिला आहे. देवस्थान जगदंबा विश्वस्त यांनी येवला तालुक्यातील सरकारी रुग्णालय येथील मेन वैद्यकीय अधीक्षक कक्ष डॉक्टर रमाकांत गणपत सोनवणे यांच्याकडे रॅबीज इंजेक्शन भेट म्हणून दिले आहेत आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला. श्रीक्षेत्र कोटमगाव जगदंबा ट्रस्टचे सर्वीकडे कौतुक केले जात आहे.
नाशिक येवला प्रतिनिधी प्रविण पाटील




