जयंतीबुलढाणामहाराष्ट्रयुवाशाळे कॉलेजसावित्रीबाई फुलेसिंदखेड राजा

शिक्षणातून समाजक्रांतीचा संदेश; संत सावता इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती जल्लोषात

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील संत सावता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, मातृतीर्थ सिंदखेड राजा

शिक्षणातून समाजक्रांतीचा संदेश; संत सावता इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती जल्लोषात

सिंदखेड राजा : विशेष प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील संत सावता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बळीराम जाधव सर यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणासाठीचे संघर्षमय जीवन, समाजसुधारणेचे कार्य व त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवण्याचे आवाहन केले.

यानंतर शाळेचे प्राचार्य प्रा. सुधाकर गोफणे सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. स्त्री-पुरुष समानता, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा या विषयांवर त्यांनी प्रभावी विचार मांडले.

कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांनी आपापली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांनीही भाषणे सादर करून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी इरफान चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन आयास चौधरी यांनी केले.

या प्रसंगी शाळेच्या संचालिका सौ. जयश्री मेहेत्रे, शाळेचे सदस्य अभिजित मेहेत्रे सर, शाळेचे प्राचार्य प्रा. सुधाकर गोफणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक तेजराव घुगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख कु. वैष्णवी अंभोरे, रुख्मिणी तौर, विज्ञान विभाग प्रमुख कु. पायल पवार, शालेय परिपाठ विभाग प्रमुख रुख्मिणी तौर, दिपाली सातपुते, संगिता खरात, मनिष बुंधे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून शिक्षणातून समाजक्रांतीचा संदेश देणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!